December 2021 Astrology: दमदार डिसेंबर! ४ ग्रहांचा राशीबदल; ‘या’ ५ राशींचे नशीब चमकेल, भरघोस लाभ मिळेल, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 09:14 PM2021-11-25T21:14:32+5:302021-11-25T21:22:18+5:30

December 2021 Astrology: डिसेंबर महिन्यात कोणते ग्रह राशीबदल करतील, कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ मिळू शकेल, जाणून घेऊया...

पाहता पाहता सन २०२१ च्या शेवटाकडे आपण आलो आहोत. सन २०२१ वर्ष संपायला केवळ एक महिना राहिला आहे. नोव्हेंबर महिन्यांची सांगता होऊन आता डिसेंबर महिन्याला सुरुवात होईल. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिने डिसेंबर महिना महत्त्वाचा मानला जात आहे. (December 2021 Astrology)

ज्योतिषशास्त्रानुसार, डिसेंबर महिन्यात ५ ग्रहांचे राशीपरिवर्तन होणार आहे. या ग्रहांच्या राशीबदलामुळे ५ राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. डिसेंबर महिन्यात कोणते ग्रह राशीबदल करतील, यामुळे कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ मिळू शकेल, जाणून घेऊया... (December 2021 Horoscope)

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला यंदाच्या वर्षीच्या शेवटच्या सूर्यग्रहणाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच ०५ डिसेंबर रोजी मंगळ ग्रह आपलेच स्वामित्व असलेल्या वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे. यानंतर ०८ डिसेंबर रोजी शुक्र शनीचे स्वामित्व असलेल्या मकर राशीत विराजमान होणार आहे. (December 2021 Horoscope in Marathi)

नवग्रहांचा राजा मानल्या गेलेला सूर्य १६ डिसेंबर रोजी गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या राशी संक्रमणाला धनु संक्रांत असेही म्हटले जाते. यावेळी नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रहही याच राशीत असेल. यामुळे बुधादित्य योग जुळून येईल. (Planetary Positions December 2021)

डिसेंबर महिन्याच्या मध्यावर १९ डिसेंबर रोजी शुक्र मकर राशीत वक्री होईल. यानंतर २९ डिसेंबर रोजी बुध धनु राशीतून शनीचे स्वामित्व असलेल्या मकर राशीत प्रवेश करेल. तर, ३० डिसेंबर रोजी शुक्र वक्री चलनाने धनु राशीत येईल. ग्रहांच्या या घडामोडींमुळे डिसेंबरचा महिना ५ राशीच्या व्यक्तींसाठी शुभ लाभदायक ठरेल, असे सांगितले जात आहे.

डिसेंबर महिन्यातील ग्रहांचा राशीबदल मेष राशीच्या व्यक्तींना सकारात्मक ठरू शकेल. चांगले परिवर्तन, बदल झालेले पाहायला मिळू शकतील. सुखद घटनांची अनुभूती घेता येऊ शकेल. आध्यात्मिक आवड वाढू सकेल. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल. मनोवांच्छित इच्छा पूर्ण होऊ शकतील. मोठ्या भावंडांचा सहयोग, सहवास लाभू शकेल. काही मंडळी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी योजना आखू शकतात.

डिसेंबर महिन्यातील ग्रहांचे राशीपरिवर्तन मिथुन राशीच्या व्यक्तींना उत्तम अनुकूल ठरू शकेल. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती यश व प्रगती साध्य करू शकतील. आध्यात्मिक आवड वाढेल. आई-वडिलांशी असलेले संबंध सुधारतील. तीर्थाटन घडू शकेल. नशीबाची उत्तम साथ लाभेल. कार्यक्षेत्रातील परिस्थिती आपल्यासाठी सकारात्मक राहू शकेल. मात्र, उधारी वेळेत चुकती करावी, असे सांगितले जात आहे.

डिसेंबर महिन्यातील ग्रहांचा राशीबदल सिंह राशीच्या व्यक्तींसाठी सुखद ठरू शकेल. दाम्पत्य जीवनातील वाद दूर होतील. भागीदारीतील व्यवहार लाभदायक ठरू शकतील. जीवन सुधारण्याच्या दृष्टीने योजना आखू शकाल. सामाजिक स्तरावर मान-सन्मान प्राप्त होऊ शकतील.

डिसेंबर महिन्यातील ग्रहांचे राशीपरिवर्तन धनु राशीच्या व्यक्तींना शुभ लाभदायक ठरू शकेल. जास्त कामामुळे आणि अधिक व्यस्ततेमुळे दगदग होऊ शकेल. पराक्रमात वाढ होऊ शकेल. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि चांगले राहील. सुखद घटनांची अनुभूती घ्याल. नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या योजना आखू शकाल. प्रेमात असलेल्या व्यक्तींना डिसेंबरचा महिना आनंददायी ठरू शकेल.

डिसेंबर महिन्यातील ग्रहांचा राशीबदल कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी प्रगतीकारक ठरू शकतो. या महिन्यात आपल्या कामांची चांगली फळे आपल्याला प्राप्त होऊ शकतील. गुंतवणुकीतून चांगले रिटर्न्स मिळू शकतील. आरोग्यात सुधारणा दिसून येऊ शकेल. नातेवाइकांकडून धनलाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, ध्यानधारणा, योगासने यातून लाभ मिळू शकेल.