ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 09:49 IST2025-11-01T09:33:59+5:302025-11-01T09:49:47+5:30
Kartiki Ekadashi 2025: २ अशुभ योग असले, तरी ३ अत्यंत शुभ योगांमुळे अनेक राशींना विविध लाभ होतील. महालक्ष्मीची कृपा राहू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

Kartiki Ekadashi 2025: ०१ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्तिकी एकादशी सुरू होत असून, ०२ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्तिकी एकादशीची सांगता होणार आहे. आषाढी एकादशीप्रमाणे लाखो भाविक कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन घेतात. आषाढी एकादशीला सुरु झालेला चातुर्मास काळ कार्तिकी एकादशीला संपतो. कार्तिकी एकादशीला देवउठनी एकादशी, विष्णुप्रबोधोत्सव असेही म्हटले जाते.

यंदाच्या कार्तिकी एकादशीला ग्रहांच्या गोचरामुळे काही शुभ तर काही अशुभ योग जुळून आलेले आहेत. शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी पंचक लागले असून, मंगळवार, ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी पंचक समाप्त होत आहे. पंचक अशुभ, प्रतिकूल मानले जाते. चंद्र कुंभ राशीत असेल. कुंभ राशीत राहु विराजमान असून, समसप्तक स्थानी सिंह राशीत असलेल्या केतुची दृष्टी यावर असणार आहे. त्यामुळे ग्रहण योग जुळून येत आहे.

हे अशुभ योग असले तरी, हंस महापुरुष, रुचक राजयोग, शुक्रादित्य राजयोग असे काही अत्यंत शुभ योगही आहेत. या एकूणच ग्रहमानाचा, शुभाशुभ योगांचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? तुमची रास कोणती? आर्थिक आघाडी, नोकरी, व्यवसाय, शिक्षण, कुटुंब, व्यवसाय-व्यापार या क्षेत्रांतील कामगिरी कशी राहू शकेल? जाणून घेऊया...

मेष: आपली वाटचाल प्रगतीकडे सुरू होईल. जी काही कामे करायची आहेत ती दमदारपणे करा. भाग्याची चांगली साथ मिळेल. महत्त्वाच्या कामात जीवनसाथीचे मत जाणून घ्यावे. सामाजिक कार्यात मोठी जबाबदारी राहील. नवीन शिकण्यात रस राहील. ठरवलेले प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण कराल. नोकरीत नवीन संधी मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य संधी मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील.

वृषभ: काही अडचणी असतील. थोडा संयम ठेवला, तर परिस्थिती आटोक्यात येण्यास वेळ लागणार नाही. सबुरीचे धोरण ठेवण्याची गरज आहे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. घाईघाईत कामे उरकण्याचा प्रयत्न करू नका. अनुकूलता बाजूने राहील. थोरामोठ्यांच्या सहवासात याल. योजनांच्या बाबतीत सकारात्मक परिणाम दिसून येतील.

मिथुन: कटू-गोड अनुभव येतील. आपला दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे. या काळात महत्त्वाची कामे करून घ्यावी. ओळखीचे फायदे होतील. आवडत्या लोकांच्या सहवासात याल. जीवनसाथीची चांगली साथ राहील. इतरांच्या भानगडीत पडू नका. आपली नेहमीची कामे वेळच्या वेळी करा. सामाजिक कार्यात सहभागी होताना अपेक्षाभंग होऊ शकतो.

कर्क: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. आत्मविश्वासाच्या बळावर कामात येणारे अडथळे ओलांडाल. सुरुवातीला कामातील बदल कामाचा ताण वाढवतील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आहार आणि आराम याकडे लक्ष द्यावे. योजना गुप्त ठेवा. अनेक अडचणी दूर होतील. मनात आनंदी विचार राहतील. संयमाने वागण्याची गरज आहे. या काळात वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.

सिंह: यशदायक काळ. नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. अचानक एखादी मोठी संधी चालून येईल. त्यामुळे जबाबदारी वाढेल आणि वेळापत्रक व्यस्त होऊन जाईल. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. मात्र, घरातील सदस्यांशी वाद होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. महत्त्वाची कामे खेळीमेळीत कशी पार पडतील याकडे लक्ष द्या. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. संयमाने वागण्याची गरज आहे.

कन्या: नवीन संधी मिळेल. कशात ना कशात व्यस्त राहाल. व्यवसायात आक्रमक धोरण राहील. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी नावाचा विचार केला जाईल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. भेटीगाठी फलद्रूप होतील. सामाजिक कार्यात मोठी जबाबदारी राहील. मुले प्रगती करतील. प्रेमात असणाऱ्यांनी सावधपणे वागण्याची गरज आहे.

तूळ: चंद्राचे भ्रमण अडचणीतून मार्ग दाखवणारे ठरेल. वाटाघाटी सफल होतील. मालमत्तेच्या व्यवहारात मोठा फायदा होऊ शकतो. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. हाती पैसा खेळता राहील. नोकरीत योग्यतेची दखल घेतली जाईल. मनासारखे काम मिळेल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. सामाजिक महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. मुलांशी संवाद ठेवा.

वृश्चिक: मनात आत्मविश्वास राहील. मात्र, अति आत्मविश्वास बाळगू नका. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जीवनसाथीच्या कलाने घ्यावे. घाईघाईत कामे करू नका. अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. शांतचित्ताने पण दमदारपणे आपली कामे करा. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. धनलक्ष्मीची प्रसन्नता राहील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. नोकरीतील बदलांकडे सकारात्मक पद्धतीने पाहा. एखादे प्रेरणादायी पुस्तक वाचून काढा.

धनु: चांगले अनुभव येतील. अनेक अडचणी दूर होतील. नोकरीत थोडी दगदग होईल. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. वरिष्ठांकडून प्रशस्तिपत्र मिळेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. भावंडांशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्या. व्यवसायात सतत व्यस्त राहाल. आर्थिक गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. थोडे सतर्क राहा. गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळा.

मकर: थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. कायद्याची बंधने पाळा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. इतरांच्या भानगडीत पडू नका. अनुकूलता अनुभवायला मिळेल. प्रेमात असणाऱ्यांना भेटवस्तू मिळतील. घरातील प्रश्न चर्चेद्वारे सोडविले पाहिजेत. नोकरीत वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ काढा.

कुंभ: यश देणारा काळ ठरेल. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. मात्र, लोकांशी चर्चा करताना खबरदारी घ्यावी. मते सर्वांना पटतीलच असे नाही. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील, असे वागावे. सुरुवातीला पैशाची आवक चांगली राहील; मात्र पैसा खर्च करण्याकडे कल राहील. गरज असेल तरच पैसा खर्च केला पाहिजे. नियमानुसार कामे करा. कुणाला जामीन राहणे शक्यतो टाळा.

मीन: धनलाभ होईल. प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. मनात सकारात्मक विचार राहतील. एखाद्या चांगल्या बातमीमुळे उत्साह वाढेल. मुलांशी संवाद राहील. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी नावाचा विचार केला जाईल. घरी पाहुणे येतील. त्यांच्याशी बोलून मन मोकळे होईल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. महत्त्वाची कामे संपवा. कुणाच्या भानगडीत पडू नका. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

















