शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

‘अशी’ मूर्ती कारमध्ये ठेवलीय? ठरू शकते अतिशय अशुभ; कोणत्या देवतेची मूर्ती असावी? नियम पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 12:24 IST

1 / 12
Rules For Lord Idol In Car: भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये आराध्य देवतेच्या नामस्मरणाला, उपासनेला अनन्य साधारण महत्त्व आहे. भारतात हजारो मंदिरे आहेत आणि कोट्यवधि भाविक दररोज न चुकता कुलदेवता, आराध्य देवता यांची उपासना करत असतात. आपली आराध्य देवतेची आपल्यावर सदैव कृपा असावी, अशीच इच्छा भाविकांची असते.
2 / 12
आराध्य देवता असेल किंवा कुलदेवता असेल, या देवतांना घरातील देवघरासह विविध ठिकाणी स्थापन केले जाते. घरात एखादी मोठी प्रतिमा लावली जाते. गळ्यात लॉकेट किंवा हातातील अंगठी स्वरुपात देवतेची प्रतिमा धारण केली जाते. आपल्याला देवतेचा विसर पडू नये आणि देवतेचेही कायम आपल्यावर लक्ष असावे, असा दुहेरी हेतू त्यात असतो.
3 / 12
कोणतीही नवीन गोष्ट घेतली की, अनेक जण ती पहिली देवापुढे ठेवतात. दुचाकी, चारचाकी, ट्रक, बस अशी मोठी वाहने घेतली, तरी आराध्य देवता किंवा कुलदेवतेच्या मंदिरात जाऊन पूजा केली जाते. देवतेची एखादी छानशी प्रतिमा किंवा मूर्ती त्या वाहनात स्थापित केली जाते.
4 / 12
आताच्या घडीला बहुतेक जण त्यांच्या कारमध्ये देवतेची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवतात. असे मानले जाते की, असे करणे नकारात्मक ऊर्जा दूर करते. अनेक जण विशेषतः गणेश, महादेव शिवशंकर किंवा इतर देवतांच्या मूर्ती डॅशबोर्डवर स्थापित करतात.
5 / 12
कोणत्या प्रकारची मूर्ती किंवा प्रतिमा कारमध्ये स्थापित करणे योग्य ठरतेच असे नाही. वास्तुशास्त्र आणि तज्ज्ञांच्या मते, चुकीच्या स्थितीत असलेली मूर्ती केवळ लक्ष विचलित करत नाही, तर वाहन चालवण्याबाबतही धोकादायक ठरू शकते, असा दावा केला जाते. त्यामुळे कारच्या डॅशबोर्डवर मूर्ती स्थापित करताना काही नियम पाळणे आवश्यक असल्याचे म्हटले जाते.
6 / 12
वास्तुशास्त्रानुसार, गणपती बाप्पा, महादेव शिवशंकर किंवा इतर कोणतीही देवता ध्यानस्थ बसली आहे, अशा प्रकारची मूर्ती अजिबात असू नये. कोणत्याही देवतेची ध्यानस्थ स्थिती ही शांतता, स्थिरता आणि आत्मनिरीक्षणाचे प्रतीक आहे. परंतु, कार किंवा कोणतेही वाहन हे गतिमान असते. त्यामुळे ही विरोधाभासाची स्थिती निर्माण करू शकते. अशा मूर्ती चालकाच्या मनावर परिणाम करू शकतात, चालकाची एकाग्रता भंग पावू शकते, असा दावा केला जातो.
7 / 12
कोणत्या देवतेची ध्यानस्थ स्थितीतील देवतेच्या मूर्ती कारमध्ये ठेवू नये, असे सांगितले जाते. विशेषतः ध्यानस्थ स्थितीतील गणपती बाप्पाची मूर्ती किंवा प्रतिमा कारमध्ये स्थापित करू नये, असा महत्त्वाचा सल्ला दिला जातो. कारण मोठ्या प्रमाणावर कारमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती किंवा प्रतिमा लावलेली आढळते.
8 / 12
प्रथमेश असलेला गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे. कारमध्ये गणपपतीची फक्त जागृत किंवा आशीर्वाद देणारी मुद्रा असलेली मूर्ती स्थापित करणे शुभ मानले जाते. कारमध्ये मूर्ती स्थापन करताना काही गोष्टींचा अवश्य विचार करावा, असे सांगितले जाते. अन्यथा त्याचा फटका बसू शकतो, असा दावा केला जाते.
9 / 12
कारमध्ये स्थापित केली जाणारी कोणत्याही देवतेची मूर्ती जागृत स्थितीत असावी. मूर्ती किंवा प्रतिमेत देवतेचे नेत्र खुलेच असावेत. जागृत स्थिती सकारात्मक ऊर्जा, दक्षता आणि संरक्षणाचे प्रतीक मानली जाते. आशीर्वाद देणाऱ्या मुद्रेत गणेशाची मूर्ती किंवा प्रतिमा तसेच भगवान शिवाची शांत पण जागृत प्रतिमा वाहनासाठी सर्वोत्तम मानली जाते.
10 / 12
जर तुम्हाला तुमच्या कारमध्ये देवतेची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवायचे असेल, तर काही महत्त्वाचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. कार चालवताना तुमची नजर सतत त्यावर जाणार नाही, अशा ठिकाणी मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी. मूर्ती ठेवण्यापूर्वी सर्व प्रथम शक्य असेल, तर ती जागा गंगाजलाने शुद्ध करून घ्यावी. त्यानंतर योग्य पद्धतीने पूजन करावे आणि मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी.
11 / 12
कधीही तुटलेली किंवा खराब झालेली मूर्ती ठेवू नये. हे अशुभ मानले जाते. मूर्तीवर फुले, हार ठेवले असतील, तर ते दररोज बदलणे आवश्यक आहे. इतर सजावटीच्या वस्तू ठेवल्या तरी तर ती जागा दररोज स्वच्छ करणे आवश्यक आहे. धूळ आणि घाण साचू नये, यासाठी मूर्ती आणि आजूबाजूची जागा दररोज किंवा वेळोवेळी स्वच्छ करत राहावी.
12 / 12
वास्तु मान्यतेनुसार, कारमध्ये किंवा मोठ्या वाहनांमध्ये योग्य प्रकारची मूर्ती किंवा चित्र ठेवावे. त्यामुळे चालकाचे मन शांत आणि एकाग्र राहू शकते. गणेश, महादेव शिवशंकर किंवा कोणत्याही देवतेची जागृत स्थितीतील मूर्तीच निवडावी. त्यामुळे अडथळे दूर होऊ शकतात, असे म्हटले जाते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्रcarकारspiritualअध्यात्मिकAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगAdhyatmikआध्यात्मिकganpatiगणपती 2025Lord ShivaमहादेवLord Krishnaभगवान श्रीकृष्णShani Devशनि देवshree datta guruदत्तगुरुshree swami samarthश्री स्वामी समर्थGajanan Maharajगजानन महाराजsaibabaसाईबाबाSiddhivinayak Ganapati Templeसिद्धिविनायक गणपती मंदिर