हनुमान जन्मोत्सव २०२६: तुमची रास कोणती? ‘या’ मंत्राचा जप नक्की करा; हनुमंत शुभ-मंगलच करतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 07:07 IST2026-04-01T07:07:07+5:302026-04-01T07:07:07+5:30

Hanuman Janmotsav 2026: हनुमान जन्मोत्सवाला तुमच्या राशीनुसार मारुतीरायाचे प्रभावी मंत्र म्हणणे अतिशय शुभ ठरू शकते. तसेच कोणता नैवेद्य दाखवावा? जाणून घ्या...

Hanuman Janmotsav 2026: गुरुवार, ०२ एप्रिल २०२६ रोजी हनुमान जन्मोत्सव आहे. मारुतीराया चिरंजीव असल्यामुळे संपूर्ण भारतात हनुमान जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरा केला जातो. हनुमंतांच्या बलभीम रुपाचे स्मरण केले जाते. पूजन केले जाते.

मारुतीचा जन्म हा चैत्र पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी झाला. मारुतीचा जन्म भारतात सर्वत्र साजरा केला जातो. महाराष्ट्रात चैत्र पौर्णिमेला ठिकठिकाणच्या मंदिरात पहाटेपासून कीर्तन सुरू होते आणि सूर्योदयाच्या वेळी मारुतीचा जन्मोत्सव साजरा केला जातो.

बलोपासना वाढविण्यासाठी, शरीर धष्टपुष्ट आणि चपळ होण्यासाठी मारुतीची उपासना आवश्यक असल्याचे म्हटले जाते. सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचे सामर्थ्य याची गरज कलियुगात महत्त्वाची मानली गेली आहे. तुमच्या राशीनुसार हनुमानाच्या कोणत्या मंत्रांचा जप करणे शुभ फलदायी ठरू शकेल? कोणता नैवेद्य अर्पण करावा? जाणून घेऊया...

मेष: मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीच्या व्यक्तींनी बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवावा. मंगलमय जीवनासाठी ॐ अं अंगारकाय नमः या मंत्राचा शक्य असेल तर १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा.

वृषभ: वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. बुंदीच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा. तसेच ॐ हं हनुमते नमः मंत्राचा १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा.

मिथुन: मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. या राशीच्या व्यक्तींनी हनुमंतांचा तुळस अर्पण करावी. तसेच 'अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यम्। सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि॥' या मंत्राचा जप करावा.

कर्क: कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. या राशीच्या व्यक्तींनी हनुमान जयंतीला बजरंगबलीला बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवावा. तसेच ॐ अंजनिसुताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो मारुति प्रचोदयात् या मंत्राचा यथाशक्ती जप करावा.

सिंह: सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. या राशीच्या व्यक्तींनी हनुमंतांना कणकेच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा. तसेच ॐ हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट या मंत्राचा यथाशक्ती जप करावा.

कन्या: कन्या राशीचा स्वामी बुध आहे. हनुमान जयंतीला मारुतीरायाला तुपातील जिलबीचा नैवेद्य दाखवावा. तुळस अर्पण करावी. तसेच 'अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यम्। सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि॥' या मंत्राचा जप करावा.

तूळ: तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या व्यक्तींनी हनुमानाला मिश्रीचा नैवेद्य दाखवावा. तसेच ॐ हं हनुमते नमः मंत्राचा १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा.

वृश्चिक: वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीच्या व्यक्तींनी हनुमान जयंतीच्या दिवशी मारुतीरायाला चणे, बुंदीचा नैवेद्य दाखवावा. तसेच ॐ अं अंगारकाय नमः या मंत्राचा शक्य असेल तर १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा.

धनु: धनु राशीचा स्वामी गुरू आहे. या राशीच्या व्यक्तींनी हनुमंतांचा केळी अर्पण करावीत. तसेच ॐ हं हनुमते नमः या मंत्राचा १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा.

मकर: मकर राशीचा स्वामी शनी आहे. या राशीच्या व्यक्तींनी मोतीचूर लाडवाचा नैवेद्य दाखवावा. तसेच ॐ नमो हनुमते रूद्रावताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोग हराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा या मंत्राचा १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा.

कुंभ: कुंभ राशीचा स्वामी शनी असून, स्वराशीत आहे. या राशीच्या व्यक्तींनी सिंदूर लेप लावावा. तसेच ॐ नमो हनुमते रूद्रावताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोग हराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा या मंत्राचा १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा.

मीन: मीन राशीचा स्वामी गुरु आहे. या राशीच्या व्यक्तींनी हनुमान जयंतीला मारुतीरायाला मलाई-मिश्री आणि लाडवाचा नैवेद्य दाखवावा. तसेच ॐ हं हनुमते नमः या मंत्राचा १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.