Guruvar Che Upay: गुरुवार विशेष उपाय कराल, तर एका हळदीच्या गाठीने मालामाल व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 17:00 IST2025-10-29T16:56:07+5:302025-10-29T17:00:45+5:30
Guruvar Che Upay: हिंदू धर्मात गुरुवार हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी विष्णूंची आणि त्यांच्या पत्नी देवी लक्ष्मी यांची भक्तीभावाने पूजा केल्यास अतिशुभ फळे मिळतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. गुरुवार हा पिवळ्या रंगासाठी शुभ दिवस मानला जातो आणि हळदीचा संबंध थेट भगवान विष्णूंशी जोडलेला आहे, त्यामुळे गुरुवारी हळदीशी संबंधित काही सोपे उपाय केल्यास धन-समस्यांपासून मुक्ती मिळते आणि लक्ष्मी-नारायणाची विशेष कृपा होऊन घरात धन-समृद्धी वाढते. ते उपाय कोणते ते पाहू!

गुरुवार हा पिवळ्या रंगासाठी शुभ दिवस मानला जातो आणि हळदीचा संबंध थेट भगवान विष्णूंशी जोडलेला आहे, त्यामुळे गुरुवारी हळदीशी संबंधित काही सोपे उपाय केल्यास धन-समस्यांपासून मुक्ती मिळते आणि लक्ष्मी-नारायणाची विशेष कृपा होऊन घरात धन-समृद्धी वाढते. ते उपाय कोणते ते पाहू!

१. तिजोरीत हळकुंड ठेवा
जर तुम्हाला सतत पैशांची चणचण भासत असेल किंवा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल, तर हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. त्यासाठी गुरुवारी सकाळी भगवान विष्णूंची पूजा करा आणि त्यांना हळकुंड अर्पण करा. पूजा आणि आरती पूर्ण झाल्यावर ती हळदीची गाठ उचलून आपल्या तिजोरीत किंवा जेथे तुम्ही धन (पैसे) ठेवता त्या ठिकाणी ठेवा. हा उपाय केल्याने आर्थिक तंगी दूर होते आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते.

२. तुळशीला हळद मिश्रित जल अर्पण करा
तुळशीच्या रोपात साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो, तर हळदीचा संबंध भगवान विष्णूंशी असतो. त्यामुळे या दोघांचा संगम लक्ष्मी-नारायण कृपेसाठी सर्वात उत्तम मानला जातो. यासाठी गुरुवारी लवकर उठून स्नान करा. विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करा. त्यानंतर एका तांब्यात किंवा कलशात शुद्ध जल घेऊन त्यात चिमूटभर हळद मिसळा. हे हळदीचे पाणी तुळशीच्या रोपाला अर्पण करा. हा उपाय नियमितपणे केल्यास धन-दौलतीत वाढ होते आणि घरात लक्ष्मी मातेची कृपा कायम राहते.

३. अडकलेले धन परत मिळवण्यासाठी
जर तुमचे धन खूप दिवसांपासून कुठे अडकले असेल किंवा धनप्राप्तीच्या मार्गात वारंवार अडथळे येत असतील, तर हा उपाय उपयोगी ठरू शकतो. यासाठी गुरुवारी सकाळी भगवान विष्णूंची पूजा करताना, थोडेसे तांदूळ घेऊन त्यांना हळद लावून पिवळे करा. हे पिवळे तांदूळ एका लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कापडात बांधून छोटीशी पुडी तयार करा. ही पुडी देवघरात ठेवा. संध्याकाळच्या पूजेनंतर ही पुडी उचलून आपल्या पर्समध्ये ठेवा.यामुळे तुमचे अडकलेले धन लवकर परत मिळण्यास आणि धनप्राप्तीतील अडथळे दूर होण्यास मदत होते.

४. पिवळी कवडी आणि हळदीचा उपाय
कवडी (पिवळी कवडी) देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय मानली जाते. गुरुवारी पूजा करताना ७ किंवा ११ पिवळ्या कवड्या घ्या आणि त्यांच्यासोबत हळदीची गाठ ठेवून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अर्पण करा. या उपायामुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात स्थिर धन राहते.

(टीप: हा लेख धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. श्रद्धा आणि भक्तीने केलेले उपाय नेहमीच लाभदायक ठरतात.)

















