३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 12:12 IST2025-10-06T12:01:42+5:302025-10-06T12:12:21+5:30
Baba Vanga Predictions 2025 Lucky Zodiac Signs: २०२५ या वर्षाचे शेवटचे तीन महिने काही राशींसाठी अत्यंत शुभ, भरभराटीचे, सुख-समृद्धीचे आणि वरदान काळाप्रमाणे जाऊ शकतात, असे भाकित बाबा वेंगांनी केले आहे. तुमची रास आहे का यात? जाणून घ्या...

Baba Vanga Predictions 2025 Lucky Zodiac Signs Horoscope: म्हणता म्हणता २०२५ या वर्षाचा उत्तरार्ध सुरू झालेला आहे. सण-उत्सव मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरे होताना वर्ष कधी सरत आले, हे समजलेच नाही. २०२५ चे शेवटचे तीन महिने आता राहिले आहेत. यानंतर २०२६ या इंग्रजी नववर्षाची सुरुवात होईल.
आपण केलेल्या कामाचे चीज व्हावे, मेहनतीचे यथायोग्य किंचितसे अधिकच फल मिळावे, अशी प्रत्येकाची मनोकामना असते. देवी लक्ष्मीची कृपा कायम असावी. घरात कोणत्या गोष्टीची कधीच कमतरता भासू नये. धन-धान्य, वैभव-ऐश्वर्य, सुख-समृद्धी, सुबत्ता असावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते.
ग्रहांच्या गोचराने शुभ योग, राजयोग जुळून येत असतात. काहीवेळा प्रतिकूल योगही भरघोस भरभराट करणारे ठरतात. बाबा वेंगाची भाकित नेहमीच चर्चेत असतात. ती केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या, ज्या कालांतराने खरी ठरल्याचे मानले जाते.
२०२५ च्या शेवटच्या तीन महिन्यांबाबत बोलायचे झाले तर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावघीत बाबा वेंगाच्या मते, हे ९० दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरू शकतात. या ४ राशींना या महिन्यांत उच्च भाग्य लाभेल. हे लोक सर्व चहुबाजूंनी आनंद, यश आणि प्रगतीची अपेक्षा करू शकतात. २०२५ या वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांत कोणत्या भाग्यवान राशींना फायदा होऊ शकतो, जाणून घेऊया...
वृषभ: २०२५ चे शेवटचे तीन महिने वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरू शकतील. या काळात नवग्रहांचा राजा सूर्याचा विशेष आशीर्वाद या राशीच्या व्यक्तींवर राहू शकेल. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ज्या संधींची वाट पाहत होता ती उपलब्ध होईल. कामात वेगाने यश प्रगती साध्य करू शकाल. कष्टाचे फळ मिळेल. आदर, मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक जीवन आनंद आणि शांततेने भरलेले असेल. या ३ महिन्यांत प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. भाग्याची आणि नशिबाची साथ बाजूने असेल. एकंदरीत, वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी असणार नाही.
मिथुन: २०२५ चे शेवटचे तीन महिने मिथुन राशीसाठी खूप शुभ संकेत घेऊन येतील. या काळात गुरु ग्रहाच्या आशीर्वादाने भाग्योदय होऊ शकेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. करिअरमध्ये यश आणि प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि सन्मान मिळू शकतात. व्यावसायिकांना लक्षणीय आर्थिक लाभ होईल. कुटुंबात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन अधिक सुसंवादी होईल. आरोग्याच्या समस्या कमी होतील आणि मन आनंदी राहील. एकूणच, मिथुन राशीसाठी हा काळ भरभराटाने भरलेला असेल.
कन्या: २०२५ चे शेवटचे तीन महिने कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ फलाने भरलेले असतील. शनिच्या आशीर्वादाने या काळात नशिबाची भरघोस साथ लाभू शकेल. दीर्घकाळापासून चालत आलेले आर्थिक प्रश्न संपतील. संपत्तीचे नवीन स्रोत येतील. कारकिर्दीत आणि व्यवसायात प्रचंड यश आणि प्रगती दिसेल. या काळात नवीन मालमत्ता किंवा वाहन मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. प्रियजनांचा भक्कम पाठिंबा मिळेल. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त करू शकाल. मेहनतीचे सर्वोत्तम फळ मिळेल. एकूणच, कन्या राशीसाठी हा काळ सुख-समृद्धीचा ठरू शकेल.
कुंभ: २०२५ चे शेवटचे तीन महिने कुंभ राशीसाठी अत्यंत शुभ असतील. शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू असला, तरी २०२५ वर्ष सरताना चौफेर लाभ होतील. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. करिअरमध्ये नवीन टप्पे साध्य होतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळण्याची संधी मिळेल. कुटुंबात आनंद राहील. जोडीदारासोबतचे नाते अधिक सुसंवादी होईल. या काळात संपत्ती, आदर, मान-सन्मान आणि यश मिळेल. एकूणच, ऑक्टोबर ते डिसेंबर हा काळ कुंभ राशीसाठी आनंद आणि प्रगतीने भरलेला असेल.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.