चतुर्ग्रही योग: ६ राशींना मिळेल अपार सुख, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; नशिबाची साथ, भाग्याचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 07:29 AM2024-01-10T07:29:04+5:302024-01-10T07:37:26+5:30

धनु राशीत ४ ग्रहांच्या संयोगामुळे अनेक शुभ योग जुळून आले आहेत. कोणत्या राशींना हा काळ उत्तम लाभदायक ठरू शकेल? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीत ४ ग्रहांचा चतुर्ग्रही योग जुळून येत आहे. विद्यमान स्थितीत धनु राशीत सूर्य, मंगळ आणि बुध हे तीन ग्रह विराजमान आहेत. तर चंद्र ग्रहाने धनु राशीत प्रवेश केला आहे.

सूर्य आणि मंगल यांच्या युतीचा आदित्य मंगल योग जुळून येत आहे. तर सूर्य आणि बुध ग्रहाच्या युतीचा बुधादित्य योग जुळून येत आहे. तसेच या तीनही ग्रहांचा त्रिग्रही योगही जुळून आला आहे. यातच चंद्र ग्रह गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीत आल्यामुळे चतुर्ग्रही योग जुळून आला आहे.

धनु राशीत या चार ग्रहांचा जुळून येत असलेला योग शुभ मानला जात आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार धनु राशीतील प्रत्येक ग्रह कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी खूप खास ठरणारा आहे. सूर्य हा चैतन्य, इच्छाशक्ती, उर्जा यांचा कारक ग्रह मानला गेला आहे. तर बुध हा बुद्धिमत्ता, नोकरी आणि व्यवसाय यांचा कारक आहे. मंगळ ग्रहाबद्दल बोलायचे झाले तर कुंडलीत मंगळाची स्थिती मजबूत असेल तर व्यक्तीला धैर्य, शौर्य आणि पुढे जाण्याचे सामर्थ्य मिळते.

मानसिक शांतता आणि मनाचा कारक चंद्र ग्रह आहे. धनु राशीमध्ये चार ग्रहांच्या अनेक शुभ योग तयार होत आहेत. जे अनेक राशींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत. चतुर्ग्रही योगाचा लाभ ६ लकी राशींना होऊ शकतो. जीवनात प्रगती भरपूर आर्थिक लाभ संभवतात, असे सांगितले जाते. जाणून घ्या...

मेष राशीच्या व्यक्तींना अनेक फायदे मिळतील. साहस आणि पराक्रमात चांगली वाढ होईल. उपजीविकेच्या क्षेत्रात लाभ मिळेल. व्यवसाय करत असाल तर व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदी करण्यात चांगले यश मिळेल. पालकांशी संबंध चांगले राहतील. कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांतता राहील. राशी स्वामी मंगळाच्या प्रभावामुळे धैर्य वाढेल. अपूर्ण कामे पूर्ण करू शकाल. चंद्राच्या शुभ प्रभावामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात मानसिक शांतता राहील.

सिंह राशीच्या व्यक्तींना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे वैयक्तिक प्रयत्नांमध्ये चांगले यश मिळेल आणि प्रभाव वाढेल. नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे चांगल्या ऑफर मिळू शकतात. करिअरला चांगली गती मिळेल. विरोधक पराभूत होतील. मंगळाच्या शुभ प्रभावामुळे यश मिळेल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगले राहील. कुटुंबातील सर्व सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

कन्या राशीच्या व्यक्तींना फायदा होईल. सूर्य ग्रहाच्या प्रभावामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. समाजात सन्मान वाढेल. तीर्थयात्रेला जाऊ शकता. मन:शांतीसोबतच आनंद अनुभवाल. शेअर्स आणि सट्टेबाजारात पैसे गुंतवले तर आर्थिक फायदा होण्याची दाट शक्यता आहे. नोकरदारांना करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी मित्र आणि सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनातील प्रत्येक टप्प्यावर जोडीदाराची साथ अनेक फायदे देईल.

तूळ राशीच्या व्यक्तींचा सामाजिक वर्तुळ वाढेल. नवीन विशेष लोकांना भेटण्याची संधी मिळू शकते. व्यवसाय केलात तर चांगला नफा मिळेल. व्यवसाय चांगला वाढवता येईल. मंगळाच्या प्रभावामुळे धैर्य वाढेल. प्रत्येक आव्हानाला संयमाने सामोरे जाल. सूर्य ग्रहाच्या प्रभावामुळे करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. अधिकारात वाढ होईल. करिअरमध्ये नाव कमावण्याची संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती मजबूत करण्याच्या अनेक संधी मिळतील. पुरेपूर फायदा घेऊ शकाल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात सर्व काही आनंदी असेल. मानसिक शांतता लाभू शकेल.

धनु राशीच्या व्यक्तींना ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे प्रत्येक कामाचा बारकाईने विचार कराल. कामात कमतरता राहणार नाही. याचा फायदा वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात दिसून येईल. चांगले काम करण्याची संधी मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर ग्रहांचे शुभ परिणाम मिळतील. व्यवसायात चांगली प्रगती करू शकाल. कुटुंबात आनंद आणि समाधान असेल. कुटुंबातील सदस्यासह मालमत्ता खरेदी करण्यात चांगले यश मिळेल.

मीन राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल. याचा फायदा जीवनाच्या विविध क्षेत्रात पाहायला मिळतील. कोणतेही काम करण्यात मागेपुढे पाहणार नाही. नशीबही बाजूने राहील. सासरच्यांसोबत संबंध चांगले राहतील. कुटुंब आणि प्रियजनांसोबत सहलीला जाण्याची संधी मिळेल. ग्रहांच्या शुभ प्रभावाने मोठी कामे सहज करू शकाल. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. आर्थिक लाभ मिळण्याची शुभ शक्यता आहे. सूर्य ग्रहाच्या प्रभावाने संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.