२०२६ संपूर्ण वर्ष ५ राशींना साडेसाती, ‘हे’ उपाय करा; शनि काही बिघडवणार नाही, उलट कृपाच करेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 13:54 IST2026-01-10T13:36:38+5:302026-01-10T13:54:13+5:30
Shani Sade Sati Effect And Impact In 2026: २०२६ संपूर्ण वर्ष ५ राशींवर शनिची वक्रदृष्टी कायम असणार आहे. साडेसाती किंवा शनि ढिय्या प्रभाव सुरू आहे, अशा लोकांनी आवर्जून न चुकता शनि संबंधातील उपाय करणे अतिशय उपयुक्त ठरू शकेल. नेमके काय करावे? जाणून घ्या...

Shani Sade Sati Effect And Impact In 2026: इंग्रजी नववर्ष २०२६ सुरू झाले आहे. या नवीन वर्षाच्या सुरुवाीलाच अनेक अद्भूत दुर्मिळ शुभ योग, राजयोग जुळून आलेले आहेत. नवग्रहांमध्ये गुरू, शनि, राहु-केतु हे अतिशय प्रभावी आणि परिणामकारक ग्रह मानले गेले आहे. या ग्रहांचे गोचर केवळ राशींवर नाही, तर देश-दुनियेवर प्रभाव असणारे असते, असे मानले जाते.

Shani Dhaiya Effects And Impact In 2026: नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनि ग्रह देव हा आताच्या घडीला मीन राशीत विराजमान आहे. मीन ही गुरूचे स्वामित्व असलेली रास आहे. नवग्रहांमध्ये सर्वांत धीम्या पद्धतीने गोचर करणारा, परंतु, तेवढाच प्रभावी आणि नवग्रहांचा न्यायाधीश ग्रह म्हणजे शनि ग्रह. शनि एका राशीत शनि तब्बल २.५ वर्षे असतो.

Sade Sati In 2026 Shani Upay In Marathi: २९ मार्च २०२५ रोजी शनि मीन राशीत विराजमान झाला आहे. आता संपूर्ण २०२६ हे वर्ष शनि मीन राशीत असणार आहे. त्यामुळे शनि ढिय्या प्रभाव आणि शनि साडेसाती यांचे चक्र २०२६ या संपूर्ण वर्षात कायम राहणार आहे. शनि साडेसाती आणि ढिय्या प्रभाव अतिशय महत्त्वाचा मानला जातो.

साडेसाती म्हणजे अशुभ, प्रतिकूल, वाईट अशी संकल्पना समाजात रुजलेली दिसते. साडेसाती शनि ग्रहामुळे येत असल्याने शनि ग्रहाकडेही काहीशा 'वक्र'दृष्टीने पाहिले जाते. साडेसाती हा शब्द केवळ उच्चारला किंवा कानावर पडला, तरी सगळ्यांच्या कपाळावर आठ्या पडतात. समोरच्या व्यक्तीची साडेसाती सुरू आहे, हे समजलं की लगेचच भुवया उंचावतात.

एकंदरीतच साडेसाती काळाबाबत अनेक समज, गैरसमज असल्याचे दिसून येते. मात्र, तसे अजिबात नाही. साडेसाती हा अनन्यसाधारण महत्त्व असणारा योग आहे. शनि मकर आणि कुंभ या दोन राशींचा स्वामी आहे. तूळ ही शनिची उच्च रास आहे, तर मेष ही त्याची नीच रास मानली जाते. तसेच अंकशास्त्रात ८ या मूलांकावर शनिचे स्वामित्व असते.

साडेसाती योग हा शनिचा विशेषाधिकार मानला गेला आहे. शनी हा कर्मकारक आहे. मानवाच्या पूर्वकर्मानुसार त्यास शुभाशुभ फळ देण्याचा सर्वाधिकार शनीग्रहास दिला आहे, असे मानले जाते. साडेसाती ही मानवाच्या आयुष्यातील शुद्धिकरण प्रक्रिया मानली गेली आहे. ०२ जून २०२७ रोजी शनि मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे.

आताच्या घडीला कुंभ, मीन आणि मेष या ३ राशींची साडेसाती सुरू आहे. जून २०२७ पर्यंत या ३ राशींची साडेसाती कायम असणार आहे. जून २०२७ मध्ये शनि ग्रहाने मेष राशीत प्रवेश केला की, कुंभ राशीची साडेसाती संपेल आणि वृषभ राशीची साडेसाती सुरू होईल.

कर्क आणि वृश्चिक या राशींवर शनि ढिय्या प्रभाव सुरू होता. शनिने मीन राशीत प्रवेश केल्यावर कर्क आणि वृश्चिक राशीचा ढिय्या प्रभाव संपला. सध्या सिंह आणि धनू या राशींवर शनिचा ढिय्या प्रभाव/अडीचकी सुरू आहे. जून २०२७ पर्यंत या दोन राशींवरील हा ढिय्या प्रभाव कायम राहणार आहे.

२०२६ हे संपूर्ण वर्ष शनि मीन राशीत असणार आहे. त्यामुळे साडेसातीचे चक्र बदलणार नाही. तसेच अडीचकी प्रभावही तसाच कायम राहणार आहे. त्यामुळे निराश न होता आपले काम प्रामाणिकपणे, समर्पणाने आणि सच्चेपणाने करावे. आपल्या चांगल्या कर्मांवर विश्वास ठेवावा, असे म्हटले जात आहे.

ज्यांची साडेसाती सुरू आहे किंवा शनिचा ढिय्या प्रभाव आहे, अशा लोकांनी आवर्जून न चुकता शनि संबंधातील उपाय, शनिचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी काही गोष्टींचे नक्कीच पालन करावे. २०२६ या वर्षांत संकल्प करून ते पाळण्याचा प्रयत्न करावा, असे केल्यास शनि कृपा सदैव राहू शकेल, असे सांगितले जात आहे.

शनि हा महादेवांना आपले गुरु मानतो, अशी मान्यता आहे. तसेच महादेवांनीच शनिला नवग्रहांचे न्यायाधीश पद दिले आहे, असेही म्हटले जाते. त्यामुळे शनि साडेसाती, ढिय्या प्रभाव, महादशा काळात शक्य तेवढी महादेवांची उपासना, नामस्मरण, मंत्रांचे जप करणे अतिशय शुभ मानले जाते.

साडेसाती सुरू असताना आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे लाभप्रद ठरते. स्वकष्टार्जीत धनातून गरजूंना अन्नधान्य दान करावे. शनिवारी काहीतरी दान करावे. शनीची साडेसाती सुरू असताना प्रतिकूल प्रभाव कमी करण्याची मारुती, विष्णू या देवांची उपासना, नामस्मरण उपयुक्त ठरते, असे सांगितले जाते.

कुंडलीत शनीची स्थिती कमकुवत असेल आणि प्रतिकूल प्रभाव कमी करायचा असेल, तर शनिवारी विशेष व्रत करावे. शनीशी संबंधित वस्तूंचे यथाशक्ती दान करावे. शनिवारी शनीदेवाच्या मंदिरात जाऊन काळे तीळ अर्पण करावे. तेलाचा दिवा लावावा. शनीची उपासना, शनी स्तोत्राचे २१ वेळा पठण, शनी चालीसा पठण, शनीदर्शन असे उपाय सांगितले जातात. ज्या लोकांना शनी महादशामुळे त्रास होत असेल त्यांनी या शनि धाम यात्रा करणे लाभदायक मानले गेले आहे.

हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थ रामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे, हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत. पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून दर शनिवारी नियमितपणे अर्पण करावे. पिंपळ पूजन, तेथे नियमितपणे दिवा लावणे, शनीच्या आवडत्या वस्तूंचे अर्पण, दान असेही काही उपाय सांगितले जातात.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
















