Buy Electric Scooter This Diwali: या दिवाळीत इलेक्ट्रीक स्कूटर घरी आणायचीय? हे आहेत 6 बेस्ट ऑप्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 02:40 PM2021-10-14T14:40:44+5:302021-10-14T14:50:05+5:30

Electric Scooter buying guide Marathi: सगळीकडेच पेट्रोल आता 110 रुपयांच्या आसपास किंवा पार गेले आहे. यामुळे लोक आता इलेक्ट्रीक स्कूटर घेण्याच्या मागे लागले आहेत. यामुळे ईव्ही खरेदी करणे आवड नाही तर गरज बनत चालली आहे.

भारतात इलेक्ट्रीक स्कूटर (Electric Scooter) घेण्यासाठी आता रांगा लागू लागल्या आहेत. ओला, सिंपल वन यांनी तर हजारो स्कूटरची बुकिंग घेतली आहे. अनेकांनी ओलाच्या स्कूटरचे पैसेही भरले आहेत. आता ही स्कूटर लोकांच्या हाती येण्याची वेळ झाली आहे. ओलाच नाही तर अशा आणखी चार स्कूटर आहेत ज्या तुम्ही दिवाळीत (Diwali) घरी आणू शकता.

सगळीकडेच पेट्रोल आता 110 रुपयांच्या आसपास किंवा पार गेले आहे. यामुळे लोक आता इलेक्ट्रीक स्कूटर घेण्याच्या मागे लागले आहेत. यामुळे ईव्ही खरेदी करणे आवड नाही तर गरज बनत चालली आहे.

ओलाने स्कूटर एस१ आणि एस१ प्रो लाँच केली आहे. या स्कूटरची किंमत 99,999 रुपयांपासून सुरु होते. 121 किमी ड्रायव्हिंग रेंज ही पहिली स्कूटर देते. प्रो 180 किमीपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. 90 किमी प्रति तासाचा वेग आहे. तसेत 18 मिनिटांत 75 किमी धावेल एवढी चार्ज होते.

सिंपल एनर्जीनं देशातील सर्वाधिक रेंज देणारी इलेक्ट्रीक स्कूटर Simple One भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. या स्कूटरमध्ये 4.8 KWh क्षमतेच्या बॅटरी पॅकचा वापर करण्यात आला आहे. तसंच या स्कूटरची मोटर 4.5 KW क्षमतेची पॉवर जनरेट करते. तसंच ही स्कूटर 2.95 सेकंदात 0 पासून 40 किलोमीटर प्रति तास वेग पकडू शकते असा दावा कंपनीनं केला आहे. या स्कूटरचा सर्वाधिक वेग 105 किमी प्रति तास इतका आहे. सिंगल चार्जमध्ये ही स्कूटर 236 किमीपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देते असा दावा कंपनीनं केला आहे.

ही कंपनीची सर्वाधिक विक्री झालेल्या प्रोडक्टपैकी एक आहे. यामध्ये कंपनीनं डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर, रिजनरेटीव्हग ब्रेकिंग, एलईडी हेडलँप, अँटी थेफ्ट अलार्म आणि पोर्टेबल बॅटरी दिली आर्हे. यामध्ये 1.2 kW BLDC इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली असून ती 1.34bhp पॉवर जनरेट करते. तसंच या स्कूटरचा सर्वाधिक वेग हा 42 किमी प्रति तास आहे. एका चार्जमध्ये ही स्कूटर 82 किलोमीटर पर्यंत जाते. हीरो ऑप्टीमाची एक्स शोरूम दिल्ली किंमत 61,640 रूपये आहे.

बजाजची चेतक जपळपास दोन दशकांनी पुन्हा भारतीय बाजारात आली आहे. परंतू ती आता इलेक्ट्रीक अवतारात आहे. ही स्कूटर 1,00,000 रुपयांना उपलब्ध आहे. फुल चार्ज केल्यावर ही स्कूटर 90 किमीची रेंज देते. पाच तासात 0 ते 100 टक्के चार्ज होते.

टीव्हीएस ही जुनी आणि विश्वासार्ह कंपनी आहे. iQube ने देखील चांगला जम बसविला आहे. याची किंमत 1,00,777 रुपये आहे. 4.2 सेकंदांत 40 किमी प्रति तासाचा वेग पकडते. तसेच ही स्कूटर एकदा चार्ज केली की 75 किमी चालते.

एथर 450X सध्या या कॅटेगरीमध्ये बेस्ट सेलर आहे. ही स्कूटर गेल्या दोन वर्षांपासून बाजारात आहे. या स्कूटरची रेंज 116 किमी आहे. साडेतीन तासात ही स्कूटर 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. ओला प्रमाणेच या स्कूटरला रिव्हर्स गिअर आहे. एथर 450Xची किंमत 1.32 लाखांपासून सुरु होते.