Tata नं Nexon पेक्षा जबरदस्त सादर केली इलेक्ट्रिक SUV; फोटो पाहून म्हणाल WOW!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 08:54 AM2023-01-12T08:54:18+5:302023-01-12T09:04:53+5:30

Tata Harrier EV At Auto Expo 2023 : कार निर्माता कंपनीने अद्याप ईव्ही कॉन्सेप्टची इंटिरिअर माहिती उघड केलेली नाही.

ऑटो एक्स्पो 2023 मध्ये टाटा मोटर्सने हॅरियर एसयूव्हीची ईव्ही कॉन्सेप्ट आणली आहे. यासह कंपनीने ईव्ही सेगमेंटबाबत आपल्या पुढील मोठ्या धोरणांची एक झकल दाखवली आहे. दरम्यान, टाटा मोटर्सच्या या नवीन एसयूव्हीचे फोटो पाहून तुमची सुद्धा खरेदी करण्याची इच्छा होईल.

नवीन टाटा हॅरियर ईव्हीला कंपनीच्या पहिल्या 'बॉर्न इलेक्ट्रिक' प्लॅटफॉर्मवर डिझाइन केले जाईल, जे दोन आणि तीन-पंक्ती सीटिंग कॉन्फिगरेशनसह येऊ शकते. नेहमीच्या मॉडेलच्या तुलनेत अनेक ईव्ही स्पेसिफिक बदल असतील.

नवीन टाटा हॅरियर ईव्ही कॉन्सेप्टच्या फ्रंट आणि रिअर असा दोन्ही बाजूस 'टी' लोगो दाखवण्यात आला आहे. हा टाटा मोटरच्या ईव्ही सेगमेंटचा टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी (TPEML) नवीन बॅज आहे.

कार निर्माता कंपनीने अद्याप ईव्ही कॉन्सेप्टची इंटिरिअर माहिती उघड केलेली नाही. यात आधुनिक टेक्नॉलॉजी, फूल कनेक्टिव्हिटी आणि ऑटो असिस्टचे फीचर्स मिळणार आहेत. कारचा लेआऊट लाउंज सारखा असल्याची शक्यता आहे.

टाटाचे समर्पित जेन 3 (बॉर्न इलेक्ट्रिक) आर्किटेक्चर आयसी इंजिन-आधारित प्लॅटफॉर्मच्या पॅकेजिंग आणि डिझाइनच्या मर्यादांपासून मुक्त असणार आहे. दरम्यान, अशी अफवा आहे की टाटा हॅरियर ईव्हीचे फायनल प्रोडक्शन मॉडेल 2025 मध्ये येऊ शकते.

दरम्यान, टाटा समूह ईव्ही क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहे. समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले की, आगामी काळात देशातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात झपाट्याने बदल होणार असून टाटा समूह या क्षेत्रात विविध उत्पादने विकसित करण्यासाठी लक्षणीय गुंतवणूक करेल.

टॅग्स :टाटाTata