बाईकप्रेमींसाठी सप्टेंबर महिना असेल खास, Bullet 350 सह 'या' भन्नाट बाईक्स होणार लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 10:02 PM2023-08-31T22:02:22+5:302023-08-31T22:05:21+5:30

Upcoming Bikes: तुम्ही नवीन बाईक घेण्याच्या विचारात असाल, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.

Upcoming Bikes: गेल्या काही वर्षांमध्ये भारत जगातील सर्वात मोठे टू-व्हिलर मार्केट बनले आहे. दरवर्षी अनेक बाइक्स देशात लॉन्च केल्या जातात. भारतातील मोटारसायकल बाजारात गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढ झाली आहे. सध्या भारतात नॉर्मल रायडिंग बाईक, स्ट्रीट फायटर, सुपरस्पोर्ट, क्रूझर, टूरर, अॅडव्हेंचर अशा विविध प्रकारच्या बाईक्स आहेत.

विशेष म्हणजे, भारतात काही महिन्यांच्या अंतराने कुठली ना कुठला बाईक लॉन्च होत असते. आता आगामी बाइक्सबद्दल बोलायचे झाले तर, Royal Enfield, KTM, TVS आणि Suzuki येत्या काही महिन्यांत त्यांच्या नवीन बाईक्स भारतात लॉन्च करणार आहेत. पुढे घेऊ या बाईक्सची संपूर्ण माहिती.

देशभरात बुलेटची वेगळीच क्रेझ आहे. Royal Enfield's ची आगामी Bullet 350 भारतात 1 सप्टेंबर 2023 रोजी लॉन्च होत आहे. याला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. डिझाईन व्यतिरिक्त, नवीन बुलेटला जे सीरीजचे नवीन चेसिस आणि इंजिन मिळेल. हे तीन व्हेरिएंटमध्ये येण्याची अपेक्षा आहे. लॉन्च झाल्यानंतर ही बाईक थेट Honda H'ness CB350 आणि Benelli Imperiale 400 ला टक्कर देईल.

TVS Apache 310 स्ट्रीट- प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, TVS ची Apache 310 Street भारतात 6 सप्टेंबर रोजी लॉन्च होत आहे. TVS च्या या स्ट्रीट फायटरमध्ये Apache RR310 चे अनेक भाग असू शकतात. ही बाईक TVS आणि BMW च्या भागीदारीमध्ये बनवली गेली आहे, त्यामुळे यात G310R चे प्रीमियम हार्डवेअर देखील असू शकतात.

2024 KTM 390 Duke- KTM ने आपले नवीन Streetfighter 390 Duke जागतिक बाजारात लॉन्च केले आहे. अशी अटकळ आहे की, कंपनी सप्टेंबरमध्ये ही बाईक भारतात लॉन्च करू शकते. आकर्षक डिझाईन व्यतिरिक्त, या मोटरसायकलमध्ये 399 सीसी लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन दिले जाईल.

सुझुकी व्ही-स्ट्रॉम 800DE- Suzuki V-Strom 800DE भारतीय रस्त्यांवर चाचणी करताना स्पॉट झाली आहे. सुझुकीने अद्याप लॉन्च डेटबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, येत्या 6 महिन्यांत ती बाईक भारतात दाखल होईल, असा अंदाज आहे.