Lokmat Money > बिझनेस न्यूज > ₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?

₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?

Wipro Azim Premji : अझीम प्रेमजी यांची कंपनी विप्रो ही भारतातील सर्वात मोठ्या टेक फर्म पैकी एक आहे. आता विप्रो आणखी एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 08:36 AM2024-05-16T08:36:47+5:302024-05-16T08:38:37+5:30

Wipro Azim Premji : अझीम प्रेमजी यांची कंपनी विप्रो ही भारतातील सर्वात मोठ्या टेक फर्म पैकी एक आहे. आता विप्रो आणखी एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे.

Azim Premji s Wipro sues person jatin dalal on rs 43 crore salary for rs 25 crore What is the matter | ₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?

₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?

Wipro Azim Premji : अझीम प्रेमजी यांची कंपनी विप्रो ही भारतातील सर्वात मोठ्या टेक फर्म पैकी एक आहे. कंपनीचं मार्केट कॅप २,४०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. विप्रो आपल्या व्यावसायिक व्यवहारांमुळे अनेकदा चर्चेत असते. आता माजी कर्मचाऱ्यांसोबतचे कायदेशीर वाद मिटवण्याच्या हेतूने ते चर्चेत आले आहे. या घडामोडीत गुंतलेल्या अधिकाऱ्यांपैकी जतीन दलाल यांना काहीसा दिलासा मिळू शकतो. 
 

विप्रोनं आपले माजी सीएफओ जतिन दलाल यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. गेल्या वर्षी २९ सप्टेंबरपासून १८ टक्के वार्षिक व्याजदरानं २५ कोटी रुपये भरण्याची मागणी केली आहे. जतिन दलाल यांनी आपल्या रोजगार करारातील नॉन कॉम्पिटिशन क्लॉजचे उल्लंघन केल्याचा आरोप करत विप्रोनं हे प्रकरण न्यायालयात नेलंय.
 

जतीन हे २००२ पासून विप्रोशी संबंधित होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी अर्थविषयक विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. २००२ ते २००४ या काळात त्यांनी वित्त प्रमुख म्हणून काम केलं आणि विप्रोच्या अंतर्गत शेअर्ड सर्व्हिसेस डिव्हिजनच्या निर्मितीचं नेतृत्व केलं. यापूर्वी २०११ ते २०१५ या कालावधीत त्यांनी बंगळुरू येथील विप्रोच्या जागतिक आयटी व्यवसायाचं सीएफओ म्हणून काम केलं होतं.
 

जतीन दलाल यांची प्रोफाईल कशी होती?
 

विप्रोमध्ये रुजू होण्यापूर्वी जतीन हे जनरल इलेक्ट्रिकच्या (जीई) प्रतिष्ठित फायनान्शियल मॅनेजमेंट प्रोग्रामचा (एफएमपी) भाग होते. येथे त्यांना 'ग्लोबल कॉर्पोरेट ऑनर्स' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. दलाल जून २०१५ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध कंपनी सल्लागार मंडळाचे सदस्य होते. ते २०२३-२०२४ या आर्थिक वर्षासाठी सीआयआयचे सीएफओ समितीचे सहअध्यक्ष पदही भूषवत आहेत.
 

एनआयटी सुरतमधून इंजिनीअरिंग
 

जतिन दलाल यांनी सुरतच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून (एनआयटी) इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे. त्यांनी एनएमआयएमएस, मुंबई येथून फायनान्स आणि इंटरनॅशनल बिझनेसमध्ये स्पेशलायझेशनसह पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (पीजीडीबीए) केलंय.

Web Title: Azim Premji s Wipro sues person jatin dalal on rs 43 crore salary for rs 25 crore What is the matter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.