रवी शास्त्रींकडे 1985 मध्ये होती ऑडी कार; पाकिस्तानविरोधात जिंकल्याने मिळालेली बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 02:58 PM2019-08-21T14:58:41+5:302019-08-21T15:10:06+5:30

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्रींची पुन्हा नियुक्ती झाली आहे. सोशल मिडीयावर त्यांची खिल्ली उडविणारे मेमे पाहून हसू आवरत नसताना शास्त्रींनी त्यांच्या कारकीर्दीत विश्व चॅम्पियनशीप टुर्नामेंटमध्ये ऑलराऊंडर कामगिरी केली होती. ही फायनल पाकिस्तानसोबत जिंकलीही होती. याबाबत फार थोड्या लोकांनाच माहिती असेल..

गोष्ट 1985 ची आहे. जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये बेन्सन अँड हेजेस क्रिकेट वर्ल्ड चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शास्त्री यांनी पाच सामन्यांमध्ये 182 रन्स बनवत 8 विकेट घेतले होते. या त्यांच्या ऑलराऊंडर कामगिरीमुळे त्यांना चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंटचे बक्षीस मिळाले होते.

हे बक्षिस साधेसुधे नव्हते बरं का...ती महागडी ऑडी कार होती. Audi 100 ही कार त्यांना तेव्हा मिळाली होती. या कारमध्ये तेव्हाचे हायटेक फिचर्स होते. भारतातील अरबपतींनाही लाजवेल अशी ही कार होती.

ही बक्षिस म्हणून मिळालेली कार रवी शास्त्रींकडे आजही आहे. जेव्हा वेळ भेटतो तेव्हा ते ही कार घेऊन बाहेर पडतात. या कारचा नंबरही हायफाय आहे. MFA 1.

Audi 100 ही सेदान प्रकारातील कार होती. या कारला जहाजातून भारतात आणण्यात आले होते. जेव्हा ही कार मुंबईच्या बंदरावर आली तेव्हा तिला पाहण्यासाठी दहा हजारहून अधिक लोक जमा झाले होते. तत्कालीन सरकारने या कारवरील आयात कर माफ केला होता.

ऑडीची ही कार तेव्हाच्या कारमधील सर्वात ताकदवान होती. या कारचे उत्पादन 1968 ते 1994 पर्यंत करण्यात आले होते. शास्त्रींकडची कार ही तिसरे जनरेशन होती. या कारसोबत ऑडीच्या संचालकानेही फोटो काढला होता.

महत्वाचे म्हणजे या वर्ल्ड चॅम्पियनशिपची फायनल पाकिस्तानबरोबर मेलबोर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळली गेली होती. या सामन्याचे सामनावीर के श्रीकांत होते.

रवी शास्त्रींना 'The Champion of Champions' म्हणून घोषीत करण्यात आले होते. यावेळी रवी शास्त्रींनी मोठ्या मनाने पाकिस्तानचा कर्णधार जावेद मियांदाद यांना 'जा, गाडीतून फिरून ये', असे म्हटले होते.