केवळ 30 रुपयांत 22 किमी चालवा इलेक्ट्रीक कार; पंतप्रधान मोदींची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 10:32 AM2019-02-12T10:32:26+5:302019-02-12T10:36:58+5:30

वाढते प्रदुषण आणि महागणारे इंधन यामुळे होणारा खर्च कमी करण्यासाठी नीती आयोगाने देशात इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी खास योजना बनविली आहे.

या योजनेनुसार केवळ 30 रुपयांमध्ये 22 किमी प्रवास करता येणार आहे. महत्वाचे म्हणजे पंतप्रधान कार्यालयानेही मंजुरी दिली आहे.

इलेक्ट्रीक वाहनांच्या नोंदणी, रस्ते कर आदींमध्ये सूट देण्यात येण्याची शक्यता आहे. कारण आयोगाने राज्य सरकारांना इलेक्ट्रीक वाहनांवर सूट देण्यास सांगितले आहे.

नीती आयोगाच्या योजनेनुसार केवळ 30 रुपयांच्या टॉपअपमध्ये 22 किमी कार धावू शकेल. या मध्ये 15 मिनिटांसाठी कार चार्ज करता येणार आहे.

EESL दिल्लीमध्ये सार्वजनिक पार्किंग आणि अन्य ठिकाणांवर फास्ट चार्जिंग स्टेशन बसविणार आहे.

हे गरजेचेही आहे, कारण जेव्हा लोकांना चार्जिंग स्टेशन दिसू लागतील तेव्हाच ते इलेक्ट्रीक कारकडे वळतील. या फास्ट चार्जिंग स्टेशनमुळे 90 मिनिटांत कार फुल चार्ज होणार आहे.

सुरुवातीला टाटा आणि महिंद्राचे वाहन चार्ज करता येणार आहेत. तसेच टू व्हीलर किंवा थ्री व्हीलरसाठी 15 वॅटचा चार्जर वापरण्यात येईल.

हे चार्जिंग स्टेशन भारत डीसी-0001 प्रणालीवर आधारित असणार आहेत.

मार्च 2019 पर्यंत दिल्लीत 84 चार्जिंग स्टेशन असणार आहेत. चार्जिंग साठी जागा, वेळ आरक्षित करण्यासाठी अॅपही देण्यात येणार आहे.