Maruti Suzuki Grand Vitara: येताच हीट ठरली मारुतीची 'ही' एसयुव्ही, आज बुक कराल तरी मिळणार पुढील वर्षी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 11:22 AM2022-09-19T11:22:12+5:302022-09-19T11:27:52+5:30

Maruti Suzuki Grand Vitara: मारुती सुझुकीची मिड साईज एसयुव्ही ग्रँड विटाराला ग्राहकांना तुफान प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत कंपनीला मोठ्या प्रमाणात बुकिंग्सही मिळाल्यात.

Maruti Suzuki Grand Vitara: नुकत्याच सादर करण्यात आलेल्या मारुती सुझुकी ग्रँड विटारा या मिड साईज एसयुव्हीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही कार लवकरच लाँच केली जाईल. परंतु लाँच होण्यापूर्वीच, कंपनीला यासाठी 55,000 पेक्षा जास्त बुकिंग मिळाली आहेत. यामुळेच या कारचा वेटिंग पीरिअड आता साडेपाच महिन्यांवर पोहोचलाय.

म्हणजेच, एखाद्या व्यक्तीने आज नवीन मारुती सुझुकी ग्रँड विटारा बुक केली तरी, त्याला पुढील वर्षीच डिलिव्हरी मिळू शकेल. दरम्यान, मिड साईज एसयुव्ही स्पेसमध्ये, नवीन मारुती ग्रँड विटारा ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टोस आणि अलीकडेच लाँच झालेल्या टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडरशी स्पर्धा करेल.

मारुती सुझुकीनं आधीच पुष्टी केली आहे की मारुती सुझुकी ग्रँड विटारा 6 व्हेरिअंटमध्ये येईल- सिग्मा, डेल्टा, झेटा, अल्फा, झेटा+ आणि अल्फा+ या व्हेरिअंट्समध्ये ही कार पाहायला मिळेल. Zeta+ आणि Alpha+ व्यतिरिक्त, सर्व व्हेरिअंट्स 1.5L पेट्रोल माइल्ड हायब्रिड पॉवरट्रेन (103bhp) सह ऑफर केल्या जातील. यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय मिळेल.

डेल्टा व्हेरिअंट 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध असेल. त्याच वेळी, मारुती सुझुकीची ऑसग्रिप सिलेक्ट एडब्ल्यूडी सिस्टम (AllGrip Select AWD) सिस्टीम मॅन्युअल गिअरबॉक्ससह फक्त Zeta आणि Alpha व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असेल. Zeta+ आणि Alpha+ व्हेरिअंटमध्ये 1.5L मजबूत हायब्रीड पॉवरट्रेन (114bhp) मिळेल, जी ई-CVT गिअरबॉक्सशी जोडलेली असेल.

Zeta+ आणि Alpha+ मध्ये लेदर स्टीयरिंग व्हील, ब्लॅक लेदर सीट्स, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, 360 डिग्री कॅमेरा, अपग्रेडेड साउंड सिस्टम, पुडल लॅम्प, हेड्स-अप डिस्प्ले, वायरलेस चार्जर, 7.0-इंच पूर्ण-डिजिटल इन्स्ट्रुमेंट यांसारखे खास फीचर्स मिळतील. क्लस्टर, डॅशबोर्ड अॅम्बियंट लाइटिंग, पॅनोरामिक सनरूफ, डार्क ग्रे फ्रन्ट आणि रिअर स्किड प्लेट्स, सिल्व्हर रूफ रेल्स, टायर प्रेशर मॉनिटर आणि ड्युअल-टोन कलर स्कीम यांचाही समावेश असेल.

स्टँडर्ड फिटमेंट लिस्टमध्ये इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल विंग मिरर, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये 4.2-इंचाचा TFT डिस्प्ले, ऑटो एअर कंडिशनिंग, रिअर एसी व्हेंट्स, कीलेस एन्ट्री अँड गो, रिअर सेंटर आर्मरेस्ट, रिअर पार्किंग सेन्सर्स, EBD सह ड्युअल एअरबॅग, ABS सह हिल होल्ड, ISOFIX माउंट आणि 3-पॉइंट सीटबेल्टसह ESP यांचाही समावेश असेल.