Maruti Suzuki Car : १ लाखांच्या डाऊनपेमेंटवर घरी आणा नवी कोरी मारूती डिझायर सीएनजी, पाहा किती असेल EMI

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 06:42 PM2023-04-30T18:42:30+5:302023-04-30T18:47:31+5:30

मारूती डिझायर ही सर्वाधित पसंत केली जाणारी कार आहे. जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर हा उत्तर पर्याय ठरू शकतो.

Maruti Suzuki Dzire CNG Loan EMI Downpament Options: मारुती सुझुकी डिझायर सेडान भारतीय बाजारपेठेत LXi, VXi, ZXi आणि ZXi+ या 4 ट्रिम लेव्हलवर एकूण 9 व्हेरिअंटमध्ये विकली जाते. यामध्ये सीएनजीचे दोन व्हेरिअंट्सही आहेत.

डिझायरची एक्स-शोरूम किंमत 6.44 लाख रुपयांपासून सुरू होते आणि ती 9.31 लाख रुपयांपर्यंत जाते. सर्वाधिक विक्री होणारी ही सेडान कार 1197 cc पेट्रोल इंजिनसह फॅक्टरी फिटेड सीएनजी किट पर्यायातही येते. मॅन्युअल तसेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांमध्येही ही कार उपलब्ध उपलब्ध आहे.

डिझायर पेट्रोल व्हेरिअंट 22.61 kmpl चं आणि CNG व्हेरिअंट 31.12 km/kg मायलेज देते. मारुती डिझायर दिसायलाही चांगली आहे आणि त्यात सर्व आवश्यक ती फीचर्सही आहेत.

मारुती सुझुकी डिझायरच्या VXI CNG मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 8.39 लाख रुपये आणि ऑन-रोड किंमत 9,44,759 रुपये आहे. जर तुम्ही Dzire VXI CNG ला 1 लाख रुपयांच्या डाउनपेमेंटसह फायनान्स केलं तर तुम्हाला 8,44,759 रुपये कर्ज घ्यावे लागेल.

कर्जाचा कालावधी 5 वर्षांपर्यंत असेल आणि व्याज दर 9 टक्के असेल तर त्यानंतर तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 17,536 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. मारुती डिझायर VXI CNG ला फायनान्स केल्यावर तुमच्याकडून संपूर्ण कालावधीसाठी 2 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज आकारले जाईल.

मारुती सुझुकी डिझायर ZXI CNG प्रकाराची एक्स-शोरूम किंमत 9.07 लाख रुपये आणि ऑन-रोड किंमत 10,17,707 रुपये आहे. तुम्ही Dzire ZXI CNG ला 1.02 लाख रुपयांच्या डाउनपेमेंटसह फायनान्स केल्यास, तुम्हाला 9,17,707 रुपये कर्ज घ्यावे लागेल.

जर तुम्ही 5 वर्षांसाठी 9 टक्के व्याजदरानं कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी दरमहा 19,050 रुपये EMI म्हणून भरावे लागेल. मारुती डिझायर ZXI CNG ला फायनान्स केल्यास तुम्हाला संपूर्ण कालावधीसाठी 2.25 लाखांपेक्षा जास्त व्याज लागेल. (टीप- कार फायनान्स करण्यापूर्वी डिलरकडे जाऊन माहिती तपासून घेणं आवश्यक आहे.)