KTM बाईकद्वारे लडाख फिरण्याची शानदार ऑफर, पेट्रोलसह सर्व मिळून येईल इतका खर्च...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 07:03 AM2021-08-12T07:03:35+5:302021-08-12T07:12:29+5:30

ktm thrillophilia organise 50 tour of ladakh : KTMने ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल Thrillophilia च्या सहकार्याने KTM Adventure Getaway प्रोग्राम सुरू केला आहे.

जर तुम्हाला डोंगराळ भागात प्रवास करायला आवडत असेल तर मोटारसायकलने लडाखला जायला नक्कीच आवडेल. यासाठी तुम्ही अनेकदा प्लॅन केला असेल, पण जाणे शक्य झाले नसेल. मात्र, यावेळी ऑफ रोड आणि अॅडव्हेंचर बाईक निर्माता कंपनी KTM ने अशी ऑफर आणली दिली आहे, त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकणार नाही. जाणून घ्या याबद्दल सविस्तर...

KTMने ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल Thrillophilia च्या सहकार्याने KTM Adventure Getaway प्रोग्राम सुरू केला आहे. हा कार्यक्रम KTM आणि Thrillophilia एकत्र येऊन पुढील एका वर्षात ५० टूर करेल. या सर्व टूर KTM 390 Adventure बाइकद्वारे केल्या जाणार आहेत. लडाखच्या टूरचे बुकिंग सर्वात आधी सुरू करण्यात आले आहे. यानंतर मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या टूरचे बुकिंग देखील सुरू होईल.

KTM आणि Thrillophilia मिळून '६ दिवस आणि ५ रात्री' साठी लडाखचा टूर प्लॅन देतील. एका वेळी १२ बाइकच्या ग्रुपमध्ये प्रवास केला जाईल. KTM ट्रॅव्हल कंपनी प्रत्येक टूरसाठी Thrillophilia ला 12 KTM 390 Adventure बाइक देईल. या बाइकद्वारे लडाखमध्ये प्रवास करण्यासाठी ग्राहकाला बेसिक प्रशिक्षण आणि पेट्रोल खर्चदेखील दिला जाईल.

KTM Adventure Getaway प्रोग्राममध्ये ग्राहकांना लडाखमधील जवळजवळ सर्व प्रमुख पॉइंट्सवर प्रवास करता येणार आहे. यात जगातील सर्वात उंच रस्ता, खरदुंग-ला पास, दुसरा उंच रस्ता, चांग-ला पास, नुब्रा व्हॅली, लेह, मॅग्नेटिक हिल, सिंधू आणि जंस्कार, पँगोंग तलाव इत्यादींचा समावेश असेल.

KTM च्या या प्रोग्राममध्ये लडाखच्या संपूर्ण प्रवासात शक्य तेथे नाश्ता, रात्रीचे जेवण, मुक्काम आणि बोनफायरचा आनंद घेता येईल. याशिवाय विमानतळावरून पिक अँड ड्रॉप, ट्रेंड टूर लीडर, मेकॅनिक, बॅकअप वाहन, हेल्मेट, बाइकचा मेंटिनेंस, क्सिजन सिलिंडर, फर्स्ट-एड, सर्व परमिट, ड्रायव्हर्स, टोल टॅक्स, लडाखचे वाइल्डलाइफ टॅक्स सुद्धा टूर प्लॅनमध्ये समावेश असेल.

KTM Adventure Getaway च्या लडाख प्लॅनसाठी तुम्ही Thrillophilia च्या साइटला भेट देऊ शकता. या प्लॅनचे बुकिंग मंगळवारपासून सुरु झाले आहे. या पॅकेजसाठी तुम्हाला प्रत्येक प्रवाशामागे २७,००० रुपये द्यावे लागतील. या पॅकेजमध्ये विमान प्रवासाचा खर्च कंपनी उचलणार नाही.

KTM 390 Adventure ला कंपनी ऑफरोड आणि अॅडव्हेंचर ट्रॅव्हलनुसार डिझाइन केली आहे. यात ३७३.२ सीसीचे एअरकूलकेलेले इंजिन आहे. हे एकच सिलिंडर ४ स्ट्रोक डीओएचसी इंजिन आहे.

हे ९००० rpmवर ४३.५ PS पॉवर आणि ७००० rpmवर 37Nm ला जास्तीत जास्त टॉर्क जनरेट करते. या बाईकमध्ये १४.५ लिटरची मोठी फ्यूल टाकी आहे. दरम्यान, या बाईकची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत ३.२८ लाख रुपयांपासून सुरू होते.