Hyundai Automobiles: Kia कॅरेन्स, XL6 ला Hyundai ची टक्कर, MPV सेगमेंटमध्ये लॉन्च केली प्रीमिअम कार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 06:27 PM2023-03-31T18:27:56+5:302023-03-31T18:31:20+5:30

Hyundai Automobiles: या कारसह Hyundai ने MPV सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे.

Hyundai Automobiles: दक्षिण पूर्व आशियाई बाजारपेठेत ह्युंदाईचा (Hyundai) दबदबा वाढतोय. याच कारणामुळे कंपनी इथल्या मार्केटमध्ये फक्त जास्त मॉडेल्सच विकत नाही तर आपले मॉडेल्स सतत अपडेट करत असते. यातच आता ह्युंदाईने एमपीव्ही (MPV) सेगमेंटमध्येही प्रवेश केला आहे. मारुती सुझुकीकडे या सेगमेंटमध्ये Ertiga आणि XL6 सारखी मॉडेल्स आहेत. तर Kia कडे कॅरेन्स आहे.

आता या सेगमेंटमध्ये इतर वाहनांना टक्कर देण्यासाठी Hyundai ने 2023 स्टारगेजर (Stargazer) लॉन्च केली आहे. सध्या ही थायलंडमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. याची सुरुवातीची किंमत 769000 थाई बात (सुमारे 18.45 लाख रुपये) आहे. तर, ब्लॅक रुफसह स्मार्ट 6-सीटर व्हेरिएंटची किंमत 909000 THB (अंदाजे रु. 21.81 लाख) आहे. Hyundai ने ही MPV 6 आणि 7 सीटर पर्यायांमध्ये लॉन्च केली आहे.

2023 Hyundai Stargazer अधिक प्रीमियम लुक आणि डिझाइनसह लॉन्च करण्यात आली आहे. याचे काही डिझाईन एलिमेंट भारतीय बाजारपेठेत लॉन्च झालेल्या नवीन वेर्नातून (Verna) घेतले गेले आहेत. याच्या मागील बाजूस H आकाराचा एलईडी लाइट बार आहे. याची साइड प्रोफाईल Staria MPV वरुन घेतलेले आहे. यात टॉप-स्पेक स्मार्ट ट्रिम्समध्ये स्टायलिश अॅलॉय व्हील आणि मिड-स्पेक व्हेरियंटसह प्लेनर अॅलॉय व्हील मिळतात.

ही MPV 1.5-लिटर NA MPi पेट्रोलच्या सिंगल इंजिन पर्यायामध्ये लॉन्च करण्यात आली आहे. हे इंजिन भारतात मिळणाऱ्या इंजिनसारखेच आहे. हे 113 Bhp पॉवर आणि 144 Nm टॉर्क जनरेट करते. यात IVT (CVT) युनिट गिअरबॉक्सचा एकच पर्याय आहे.

Stargazer च्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, यात ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, अँड्रॉइड ऑटो आणि Apple CarPlay सह टचस्क्रीन इंफोटेनमेंट, स्टीयरिंग माउंटेड ऑडिओ कंट्रोल्स, क्रूझ कंट्रोल, एलईडी हेडलाइट्स, एलईडी टेललाइट्स, 16-इंच अलॉयज, वायरलेस चार्जर, अॅम्बियंट लाइटिंगचा समावेश असेल.

Stargazer MPV ची लांबी 4460mm, रुंदी 1780mm आणि उंची 1695mm आहे. याचा व्हीलबेस 2780mm आहे, जो Kia Carens सारखाच आहे. कॅरेन्सची लांबी आणि रुंदी स्टारगेझरपेक्षा जास्त आहे. Hyundai लवकरच इतर आशियाई देशांमध्ये Stargazer लॉन्च करू शकते. थायलंडमध्ये याची स्पर्धा सुझुकी एर्टिगा, होंडा BR-V, मित्सुबिशी एक्सपँडर आणि टोयोटा विलोशी होईल.