दमदार इंजिन, शानदार लुक्स; Hero ची बहुप्रतिक्षित Mavrick 440 लॉन्च; किंमत फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 03:15 PM2024-02-14T15:15:10+5:302024-02-14T15:20:49+5:30

या दमदार बाईकची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती.

Hero Mavrick 440 Launch: देशातील आघाडीची टू-व्हिलर निर्माता कंपनी Hero ने आपली बहुचर्चित-बहुप्रतिक्षइत Maverick 440 बाईक लॉन्च केली आहे. बाईकसाठी बुकिंगही सुरू झाले आहे, मात्र डिलिव्हरी एप्रिलपासून सुरू मिळेल. कंपनीने या बाईकचे तीन व्हर्जन लॉन्च केले आहेत.

ही नवीन Hero Maverick 440 बेस, मिड आणि टॉप व्हर्जनमध्ये मिळेल. याची किंमत अनुक्रमे रु. 1.99 लाख, रु. 2.14 लाख आणि रु 2.24 लाख (एक्स-शोरुम पॅन-इंडिया) असेल.

बाईकमध्ये इलेक्ट्रॉनिक फ्यूअल इंजेक्शनसह एअर-कूल्ड, ऑइल कूल्ड 2V सिंगल सिलेंडर 440cc 'TorqX' इंजिन मिळेल. हे लॉन्ग-स्ट्रोक इंजिन 6,000rpm वर 27bhp आणि 4,000rpm पर 36Nm आउटपुट देण्यास सक्षम आहे.

हिरोचा दावा आहे की, या बाईकमध्ये 90% पीक टॉर्क फक्त 2000rpm वर उपलब्ध आहे. इंजिनला स्लिप आणि असिस्ट क्लचसह 6-स्पीड ट्रान्समिशनही देण्यात आले आहे.

याशिवाय, यात 130 मिमी ट्रॅव्हलसह टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क आणि 130 मिमी ट्रॅव्हलसह हायड्रॉलिक रीअर ट्विन शॉक स्विंगआर्म माउंट आहे. बाईकला पुढील बाजूस 100/70 आणि मागील बाजूस 150/60 टायरसह 17-इंच व्हील मिळतील.

ब्रेकिंगसाठी या बाईकमध्ये 320 मिमी फ्रंट डिस्क आणि 240 मिमी रिअर डिस्क आहे. याशिवाय, यामध्ये ड्युअल चॅनल एबीएस सिस्टीमदेखील देण्यात आली आहे.

बाईकच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, यात मेटल स्टायलिंग बॉडी पार्ट्स, गोल एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट्स, डीआरएल आणि इंटेलिजेंट ऑटोमॅटिक हेडलाइट्ससह मस्क्यूलर फ्यूअल टँक मिळतो, ज्यात 13.5 लिटर पेट्रोल बसू शकते. 15 मार्चपूर्वी Maverick 440 बुक करणाऱ्या ग्राहकांना 10,000 रुपयांपर्यंतच्या ॲक्सेसरीज आणि मर्चेंडाईजचे मोफत मिळणार आहे.