Ford Motors:टाटाचे टेन्शन वाढणार! स्वस्त इलेक्ट्रिक कारसह फोर्ड करणार पुनरागमन?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 04:14 PM2022-02-13T16:14:51+5:302022-02-13T16:18:19+5:30

भारतात इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये मोठी ग्रोथ होत आहे, त्यामुळे अनेक कंपन्या इलेक्ट्रीक सेगमेंटमध्ये येण्याच्या तयारीत आहेत.

बराच काळ भारतात व्यवसाय केल्यानंतर काही काळापूर्वीच फोर्ड (Ford)कंपनीने भारतात आपले कामकाज बंद केले. या कंपनीचा भारतात मोठा ग्राहकवर्ग आहे. तुम्हालाही फोर्ड कार आवडत असतील तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे.

काही मीडिया रिपोर्टनुसार, फोर्ड लवकरच भारतीय बाजारपेठेत पुनरागमन करू शकते. स्वस्त इलेक्ट्रिक कारसह कंपनी भारतात इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये दमदार पुनरागमण करण्याच्या तयारीत आहे.

फोर्ड भारतात आल्यावर त्याची थेट टाटाशी स्पर्धा असेल, कारण सध्या टाटा मोटर्सने भारतीय इलेक्ट्रिक बाजार व्यापला आहे. कंपनीच्या Tata Nexon EV आणि Tata Tigor EV या देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक कार आहेत.

25937 कोटी रुपयांच्या PLI योजनेंतर्गत निवडलेल्या 20 ऑटोमोबाईल कंपन्यांपैकी फोर्ड ही एक आहे. PLI इलेक्ट्रिक उत्‍पादनांची निर्मिती आणि विक्रीसाठी प्रॉडक्शन लिंक्ड इंटेन्‍सिव्ह योजना आहे.

फोर्ड इंडियाने भारतीय बाजारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता, पण आता भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ सतत वाढत असल्याने फोर्ड परत येण्याच्या विचारात आहे.

भारतीय बाजारात अनेक मोठमोठे कार उत्पादक त्यांच्या गाड्या लॉन्च करत आहेत, त्यामुळे फोर्डही या सेगमेंटमध्ये प्रवेश करण्यास तयार आहे.

सध्या भारतात फोर्डचे दोन कार प्लांट आहेत. फोर्डने अलीकडेच ईव्ही आणि बॅटरीमध्ये $30 अब्ज गुंतवण्याची योजना असल्याचे जाहीर केले आहे.