फक्त 4 लाखांत मिळेल Electric car, देशातील सर्वात स्वस्त ई-कार, टाटा-महिंद्राही लिस्टमध्ये...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 03:59 PM2023-01-26T15:59:27+5:302023-01-26T16:06:01+5:30

Electric car : जाणून घ्या कोणत्या आहेत, बजेट इलेक्ट्रिक कार?

नवी दिल्ली : इलेक्ट्रिक कारची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, लोकांची कार खरेदी करण्याची इच्छा असली तरीही जास्त किंमतीमुळे ते खदेदी करू शकत नाहीत. पण आता काही इलेक्ट्रिक कारही बाजारात आहेत, ज्यांची किंमतही कमी आहे आणि रेंजही खूप चांगली आहे. या यादीत टाटा आणि महिंद्राच्या कार देखील आहेत, ज्या स्वस्त आहेत आणि त्यामध्ये बरीच फीचर्स आहेत. जाणून घ्या कोणत्या आहेत, बजेट इलेक्ट्रिक कार?

भारतीय स्टार्टअप कंपनी PMV ने आपली इलेक्ट्रिक कार EAS-E लाँच केली आहे. या कारचे बुकिंगही सुरू झाले आहे. कारची एक्स-शोरूम किंमत सुमारे 4 लाख रुपयांपासून सुरू होते. कंपनीच्या वेबसाइटवरून तुम्ही ही कार सहज बुक करू शकता. ही कार बुक करण्यासाठी, तुम्हाला 10,000 रुपये डाउन पेमेंट करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला डिलिव्हरीची तारीख आणि पेमेंट पावती मिळेल.

बजेट कार असूनही फिचर्सची विशेष काळजी घेण्यात आली आहे. कारमध्ये डिजिटल इन्फोटेनमेंट सिस्टम, कीलेस एंट्री, क्रूझ कंट्रोल, नेव्हिगेशन आणि फीट फ्री ड्राईव्ह सारखी फीचर्स आहेत. सिंगल चार्जमध्ये ही कार 200 किमीपर्यंत रेंज देईल, असा कंपनीचा दावा आहे.

अलीकडेच महिंद्राने आपली लोकप्रिय SUV XUV400 चे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच केले होते. परंतु महिंद्राच्या आधीच इलेक्ट्रिक कार बाजारात आहेत. महिंद्राच्या सेडान व्हेरिटोचे इलेक्ट्रिक व्हर्जन बरेच दिवसांपासून बाजारात आपले स्थान टिकवून आहे. या कारची किंमत 9.13 लाख रुपयांपासून सुरू होते आणि एक्स-शोरूम 9.46 लाख रुपयांपर्यंत जाते.

महिंद्राच्या कारमध्ये खूप चांगले फीचर्स आहेत. इन्फोटेनमेंट सिस्टीमसोबतच फास्ट चार्जिंग, अलॉय व्हील्स, कीलेस एंट्री, एअरबॅग्ज यांसारखे फीचर्स उपलब्ध आहेत. दुसरीकडे, जर आपण कारच्या रेंजबद्दल बोललो तर कंपनी सिंगल चार्जमध्ये 150 किमीच्या मायलेजचा दावा करत आहे.

इलेक्ट्रिक कारबद्दल बोलायचे झाले तर टाटाचे नाव येत नाही असे होऊ शकत नाही. टाटाने आपली इलेक्ट्रिक कार टियागो (Tiago) गेल्या वर्षीच लाँच केली होती. त्या काळात ती सर्वात जास्त रेंज असलेली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार होती. या कारची सुरुवातीची किंमत 8.49 लाख रुपयांपासून सुरू होते आणि एक्स-शोरूम 11.79 लाख रुपयांपर्यंत जाते. या कारच्या लॉन्चिंगसोबतच बंपर बुकिंग झाले होते.

टियागो ईव्हीचा (Tiago EV) सर्वात मोठा USP त्याची रेंज होती. कंपनीने आपले दोन मॉडेल लाँच केले होते, ज्यामध्ये 19.2 आणि 24 kWh बॅटरी पॅक लावण्यात आले आहेत. ते 315 ते 350 किमीपर्यंतची रेंज ऑफर करतात. कारमध्ये अनेक फीचर्स देखील आहेत. यात टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, नेव्हिगेशन, कीलेस एंट्री, एअरबॅग्ज, एबीएस यांसारखे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत.