सनरूफ असलेल्या 'या' सर्वात स्वस्त कार; जवळपास 8 लाख रुपयांपासून किंमत सुरू होतेय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 06:06 PM2022-02-28T18:06:50+5:302022-02-28T18:12:27+5:30

cheapest cars with sunroof : जर तुम्ही स्वस्त सनरूफ असलेली कार शोधत असाल, तर माहीत करून घ्या भारतात अशा कोणत्या कार आहेत, ज्या कमी किमतीत सनरूफ देतात.

सध्या सनरूफ असलेल्या कारचा खूप ट्रेंड आहे. परंतु तुम्हाला हे देखील माहित असेल की सनरूफ नसलेल्या कारपेक्षा सनरूफ असलेल्या कार अधिक महाग आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही स्वस्त सनरूफ असलेली कार शोधत असाल, तर माहीत करून घ्या भारतात अशा कोणत्या कार आहेत, ज्या कमी किमतीत सनरूफ देतात.

यामध्ये महिंद्र एक्सयूव्ही 300 (Mahindra XUV300), फोर्ड ईकोस्पोर्ट (Ford EcoSport), ह्युंदाई व्हेन्यू (Hyundai Venue), किआ सोनेट (Kia Sonnet) आणि टाटा नेक्सॉन (Tata Nexon) सारख्या कारचा समावेश आहे.

टाटा नेक्सॉन एक्सएम -एस (Tata Nexon XM-S) मध्ये सनरूफ आहे. या कारची किंमत जवळपास 8.86 लाख रुपये आहे. यात ऑटो-फोल्डिंग बाहेरील रीअरव्ह्यू मिरर, रेन-सेन्सिंग वायपर्स, ऑटो हेडलॅम्प आणि 4-स्पीकर हरमन साउंड सिस्टीम यांसारखी अनेक फीचर्स आहेत.

किआ सोनेट (Kia Sonet) ही एक SUV कार आहे, जी दिसायला शानदार आहे. यामध्ये सनरूफ फीचर देखील आहे. कारच्या HTX प्रकारात सनरूफ उपलब्ध आहे. कारची किंमत जवळपास 8.70 लाख रुपये आहे. ही कार वेन्यू प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे.

जुन्या ह्युंडाई आय 20 मध्ये (Hyundai i20) सनरूफ नव्हते. मात्र, नवीन जनरेशनच्या Hyundai i20 मध्ये सनरूफ देण्यात आला आहे. सनरूफसह Hyundai i20 ची किंमत जवळपास 9.4 लाख रुपये आहे.

ह्युंडाई व्हेन्यू (Hyundai Venue) कारमध्ये सनरूफ फीचर उपलब्ध आहे. सनरूफसह Hyundai Venue ची किंमत सुमारे 9.97 लाख रुपये आहे. Hyundai Vanya ची विक्री शानदार झाली आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

महिंद्रा एक्सयूव्ही 300 (Mahindra XUV300) ही एक SUV कार आहे. अपडेटेड कारमध्ये सनरूफ फीचर जोडण्यात आले आहे. सनरूफ सोबतच्या कारची किंमत सुमारे 9.9 लाख रुपये आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह येते.

फोर्ड इकोस्पोर्टमध्ये (Ford EcoSport) सनरूफचा पर्यायही उपलब्ध आहे. इकोस्पोर्टच्या टायटॅनियम व्हेरिएंटमध्ये हे फिचर देण्यात आले आहे. कारच्या सुरुवातीच्या व्हेरिएंटची किंमत सुमारे 8.20 लाख रुपये आहे, जी सुमारे 11.70 लाख रुपये आहे.