४-४-०-३! वर्ल्ड कप इतिहासातील भारी स्पेल, Lockie Ferguson ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, Video 

पापुआ न्यू गिनिविरुद्ध त्यांचा गोलंदाज ल्युकी फर्ग्युसन ( Lockie Ferguson ) याने सर्वात भारी स्पेल टाकली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 10:30 PM2024-06-17T22:30:54+5:302024-06-17T22:31:22+5:30

whatsapp join usJoin us
NZ vs PNG T20 World Cup 2024 : FOUR OVERS, FOUR MAIDENS! Lockie Ferguson bowls the most economical spell in T20 World Cup history, Video | ४-४-०-३! वर्ल्ड कप इतिहासातील भारी स्पेल, Lockie Ferguson ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, Video 

४-४-०-३! वर्ल्ड कप इतिहासातील भारी स्पेल, Lockie Ferguson ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

NZ vs PNG T20 World Cup 2024 : न्यूझीलंडने शेवटच्या साखळी सामन्यात पापुआ न्यू गिनीविरुद्ध टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यामुळे न्यूझीलंड स्पर्धेचा शेवट विजयाने करण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरला. पापुआ न्यू गिनिविरुद्ध त्यांचा गोलंदाज ल्युकी फर्ग्युसन ( Lockie Ferguson ) याने सर्वात भारी स्पेल टाकली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील ती सर्वात इकॉनॉमिकल स्पेल ठरली.


PNG चा सलामीवीर टॉनी उरा ( १) याला टीम साऊदीने दुसऱ्या षटकार माघारी पाठवले. त्यानंतर पाचव्या षटकात कर्णधार आसाद वाला ( ६) याला फर्ग्युसनने माघारी पाठवले. त्याचे हे षटक निर्धाव राहिले. चार्ल्स आमिनी व सेसे बाऊ यांनी PNG चा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु १२ व्या षटकात फर्ग्युसनने ही जोडी तोडताना आमिनीला ( १७) पायचीत केले. मिचेल सँटनरने PNG चा सेट फलंदाज बाऊला ( १२) बाद केले. फर्ग्युसनने त्याच्या पुढच्या षटकात चॅड सोपरचा ( १) त्रिफळा उडवून PNG ची अवस्था ५ बाद ४३ अशी केली. 


ट्रेंट बोल्ट व टीम साऊदी यांनी अनुक्रमे हिरी हिरी ( ७) व किप्लिन डोरीगा ( ५) यांचा त्रिफळा उडवला. बोल्टने त्याच्या ४ षटकांत १४ धावा देताना २ विकेट्स घेतल्या. साऊदी ( २-११) व ईश सोढी ( २-२९) यांनीही प्रत्येकी २ विकेट्स घेताना PNG चा संपूर्ण संघ ७८ धावांत तंबूत पाठवला. 

 

ल्युकी फर्ग्युसनचा वर्ल्ड रेकॉर्ड...
ल्युकी फर्ग्युसनने आजच्या सामन्यात ४-४-०-३ अशी स्पेल टाकली. म्हणजे त्याने त्याच्या चार षटकांत एकही धाव न देता ३ विकेट्स घेतल्या. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत असा पराक्रम करणारा फर्ग्युसन हा पहिलाच गोलंदाज ठरला. वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासातील ही सर्वात इकॉनॉमिकल स्पेल ठरली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त कॅनडाच्या साद बिन जाफर ( वि. पनामा, २०२१) याच्यानंतर चारही षटकं निर्धाव टाकणारा तो दुसरा गोलंदाज बनला.  


ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इकॉनॉमिक स्पेलचा विक्रम हा टीम साऊदीच्या ( ३-४ वि. युगांडा, २०२४) याच्या नावावर होता.  

Web Title: NZ vs PNG T20 World Cup 2024 : FOUR OVERS, FOUR MAIDENS! Lockie Ferguson bowls the most economical spell in T20 World Cup history, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.