Car Buying: 'या' आहेत बेस्ट 7 सीटर कार, किंमत फक्त 4.26 लाखांपासून सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 03:15 PM2022-01-06T15:15:30+5:302022-01-06T15:23:59+5:30

तुम्ही 7 सीटर कार घेण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला काही चांगल्या कार्सबद्दल सांगणार आहोत. कमी बजेटमध्ये तुम्हाला या कारमध्ये अनेक खास फीचर्स देखील मिळतील.

कार खरेदी करणे हे एक आव्हानात्मक काम आहे. एकाच मॉडेलबाबत बाजारात इतके पर्याय उपलब्ध आहेत की, कोणता पर्याय योग्य असेल, हे ठरवणे अवघड जाते.

जर तुमचे कुटुंब थोडे मोठे असेल आणि तुम्ही त्यांना लक्षात घेऊन 7 सीटर कार घेण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही चांगल्या कारबद्दल सांगणार आहोत. कमी बजेटमध्ये या कारमध्ये तुम्हाला अनेक खास फीचर्स देखील मिळतील.

या 7 सीटर कारची एक्स-शोरूम किंमत 4.26 लाखांपासून सुरू होते. याशिवाय या 7 सीटर कार तुम्हाला डिझेल, पेट्रोल आणि सीएनजी या तिन्ही पर्यायांमध्ये मिळतात.

महिंद्रा बोलेरो निओ- महिंद्रा बोलेरो निओ कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. या 7 सीटर कारमध्ये 1,493 सीसी इंजिन आहे. महिंद्राची ही डिझेल कार आहे. ही गाडी 1 लिटर डिझेलमध्ये 17 किमी धावू शकते. या कारची एक्स-शोरूम किंमत 8.77 लाख आहे.

मारुती सुझुकी एर्टिगा- तुम्ही फॅमिली कार घेण्याचा विचार करत असाल, तर मारुती सुझुकी एर्टिगा तुमच्यासाठी खूप चांगली कार सिद्ध होऊ शकते. या 7 सीटर कारची एक्स-शोरूम किंमत 7.96 लाख रुपये आहे. मारुतीच्या या कारमध्ये तुम्हाला पेट्रोल आणि सीएनजी दोन्हीचा पर्याय मिळेल. ही कार 1 किलो सीएनजीमध्ये 17 ते 26 किमी मायलेज सहज देते. या मॉडेलमध्ये तुम्हाला इतरही अनेक प्रकार पाहायला मिळतील.

मारुती सुझुकी Eeco- कमी बजेटमध्ये चांगल्या 7 सीटर कारचा पर्याय शोधत असाल, तर ही कार तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. याची एक्स-शोरूम किंमत 4.38 लाख रुपये आहे. या कारमध्ये 1,196 cc चे इंजिन बसवण्यात आले आहे. यामध्ये तुम्हाला 5 सीटर आणि 7 सीटर असे दोन्ही प्रकार मिळतील. याचे मायलेजही खूप चांगले आहे.

डॅटसन गो- ही कार सर्वात स्वस्त 7 सीटर कारपैकी एक आहे. त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4.26 लाख रुपये आहे. तुम्ही उत्तम आणि परवडणाऱ्या फॅमिली कारचा पर्याय शोधत असाल, तर ही कार तुमच्यासाठी बनवली आहे. यामध्ये तुम्हाला उत्तम मायलेज मिळतो. कारमध्ये 1,198 सीसीचे इंजिन बसवण्यात आले आहे.