१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 10:55 AM2024-05-07T10:55:36+5:302024-05-07T11:11:56+5:30

वृषभ राशीत जुळून येत असलेल्या चतुर्ग्रही योगाचा कोणत्या राशींवर शुभ प्रभाव पडू शकेल? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रह नियमित अंतराने राशीपरिवर्तन करत असतात. यामुळे विविध प्रकारचे योग, शुभ योग, राजयोग, युती योग जुळून येत असतात. मे महिन्यात वृषभ राशीत नवग्रहांपैकी ४ शुभ ग्रहांच्या प्रवेशाने चतुर्ग्रही योग जुळून येणार आहे.

०१ मे रोजी गुरु ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केला असून, आता नवग्रहांचा राजा सूर्य वृषभ राशीत विराजमान होणार आहे. तसेच त्यानंतर शुक्र आणि बुध हे दोन ग्रहही वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत. या चार ग्रहांचा चतुर्ग्रही योग जुळून येणार आहे. काही मान्यतांनुसार अशा प्रकारचा योग १०० वर्षांनी जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे.

सूर्य आणि बुधाचा बुधादित्य राजयोग, तसेच सूर्य आणि शुक्र यांचा शुक्र आदित्य योग, लक्ष्मी नारायण योग असे अनेक शुभ योग जुळून येत आहेत. याचा ५ राशींवर शुभ प्रभाव पडू शकेल, असे सांगितले जात आहे.

वृषभ: नशिबाची साथ मिळेल. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होताना दिसतील. कामात यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि समर्पणाची प्रशंसा होईल. नोकरदार लोकांना नवीन नोकरीसाठी चांगली संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना सुवर्णसंधी मिळू शकते. चांगला व्यवहार होऊ शकतो.

कर्क: पैशाची कमतरता भासणार नाही. आर्थिक सुबत्ता येईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगली प्रगती दिसेल. नवीन व्यवसायाच्या शोधात असाल तर योजना प्रभावी ठरतील. नोकरीत पगारवाढ आणि बढती मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये चांगले यश मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

कन्या: आगामी काळ अनुकूल सिद्ध होईल. काम आणि व्यवसायात चांगले यश मिळेल. चारही शुभ ग्रह मिळून शिक्षणाच्या बाबतीत यश मिळवून देतील. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळू शकते. परीक्षेत यश मिळू शकते. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक: वैयक्तिक आयुष्य चांगले राहील. आनंद मिळेल. कुटुंबातील सर्वजण चांगले राहतील. आर्थिक लाभ होईल. काळजीपूर्वक काम केले तर ते करिअरसाठीही चांगले राहील. सासरच्या लोकांकडून लाभ होऊ शकतो. धार्मिक प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे.

मकर: शैक्षणिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक समृद्धीचा लाभ मिळेल. नशिबाने साथ दिल्याने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि आरोग्य चांगले राहील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.