बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डनं Goan Classic 350 मध्ये केला जबरदस्त बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 20:31 IST2026-01-12T20:28:21+5:302026-01-12T20:31:50+5:30

2026 Royal Enfield Goan Classic 350: क्लासिक लूक आणि आधुनिक फीचर्सचे परफेक्ट कॉम्बिनेशन शोधणाऱ्यांसाठी रॉयल एनफिल्डने आपली २०२६ गोआन क्लासिक ३५० अपडेटेड फीचर्ससह बाजारात आणली आहे. लूक तोच रांगडा असला, तरी चालवण्याचा अनुभव मात्र आता अधिक स्मूथ होणार आहे!

रॉयल एनफिल्डने २०२६ गोआन क्लासिक ३५० अपडेटेड व्हर्जन भारतात लाँच केले असून, याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹२.१९ लाख आहे. ही बाईक आता सर्व अधिकृत शोरूममध्ये उपलब्ध आहे.

रायडरची सोय लक्षात घेऊन कंपनीने प्रथमच या मॉडेलमध्ये असिस्ट-अँड-स्लिपर क्लच सादर केला आहे, ज्यामुळे गिअर शिफ्टिंग अत्यंत सुलभ आणि हलकी होणार आहे.

प्रवासादरम्यान मोबाईल चार्जिंगसाठी यात नवीन यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे, जो जुन्या पोर्टपेक्षा अधिक वेगाने फोन चार्ज करण्यास मदत करेल.

यात ३४९ सीसीचे एअर-ऑइल-कूल्ड इंजिन असून ते २०.२ बीएचपी पॉवर आणि २७ एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

मोटारसायकलच्या मूळ 'बॉबर' डिझाइनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. यात आजही फ्लोटिंग सीट, उंच हँडलबार, व्हाईटवॉल ट्यूबलेस टायर्स आणि चॉपर-स्टाईल फेंडर्स पाहायला मिळतात.

या बाईकच्या 'शेक ब्लॅक' आणि 'पर्पल हेझ' रंगाची किंमत ₹२ लाख १९ हजार ७८७ आहे. तर, प्रीमियम 'ट्रिप टील ग्रीन' आणि 'रेव्ह रेड' प्रकारांची किंमत ₹२ लाख २२ हजार ५९३ (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे.