शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
3
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
4
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
5
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
6
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
7
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
8
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
9
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
10
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
11
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
12
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
13
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
14
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
15
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
16
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
17
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
18
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
19
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
20
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा

कपडे धुण्यासाठी गेलेल्या युवतीचा कॅनॉलमध्ये बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 6:10 PM

पाथरी तालुक्यातील वरखेड येथील घटना

पाथरी : जायकवाडीच्या डाव्या कालव्यावर सोमवारी कपडे धुण्यासाठी गेलेली युवती पाय घसरून पाण्यात बुडाली होती .  आज सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास तिचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे .

जायकवाडीच्या डाव्या कालव्यात सध्या उन्हाळी हंगामात पिकासाठी पाणी सोडण्यात आलेले आहे. तालुक्यातील वरखेड  गावाच्या जवळून डावा कालवा गेलेला आहे. गावातील महिला कॅनलला कपडे धुण्यासाठी जातात. सोमवार 5 एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ऋतिका अश्विन मकासरे (19, रा. सर्वोदय नगर सेलू हल्ली मुक्काम वरखेड ) ही कपडे धुण्यासाठी साठी गेली होती. यावेळी तिचा पाय घसरून ऋतिका वाहत्या पाण्यात पडली. यातच तिचा बुडून मृत्यू झाला आहे. 

आज सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास तिचा मृतदेह किन्होळा खु. शिवारात आढळून आला. याप्रकरणी नाथा राणू भुजबळ राहणार वरखेड यांच्या माहितीवरून आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे .घटनास्थळी पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण व उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी भेट दिली आहे .पुढील तपास पाथरी पोलिस करत आहेत .

टॅग्स :Deathमृत्यूparabhaniपरभणी