भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू; ऑटो चालक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 19:12 IST2020-12-24T19:12:17+5:302020-12-24T19:12:31+5:30

गंगाखेड येथून परळीकडे भरधाव वेगात जाणाऱ्या दोन ट्रॉलीच्या ट्रॅक्टरने दिली धडक.

Woman dies on the spot after being hit by a tractor; Auto driver seriously injured | भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू; ऑटो चालक गंभीर जखमी

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू; ऑटो चालक गंभीर जखमी

ठळक मुद्देगंगाखेड - परळी रस्त्यावरील करम पाटी जवळ अपघात

गंगाखेड: भरधाव वेगात असलेल्या ट्रॅक्टरने महिलेसह ऑटोला धडक दिल्याने या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर ऑटो चालक गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि. २४ ) दुपारी ४ वाजेच्या सुमारास गंगाखेड - परळी रस्त्यावरील करम पाटी जवळ घडली.

गंगाखेड येथून परळीकडे भरधाव वेगात जाणाऱ्या दोन ट्रॉलीच्या ट्रॅक्टरने  ( एम एच ४४ एस २०८६ ) ऑटोला ( एम एच २२ एच ४७३०) आणि त्यामधून उतरलेल्या शेख मैमुनाबी शेख मौला ( ६०, रा. करम ता. सोनपेठ ) यांना जोरदार धडक दिली. यात शेख मैमुनाबी शेख मौला यांचा जागीच मृत्यू झाला. तर ऑटो चालक नवनाथ राठोड हा गंभीर जखमी झाला आहे. 

भुजंग हुंबे, विष्णू पोते, शेख जुबेर, शेख मंजूर आदी ग्रामस्थांनी गंभीर जखमी असलेल्या चालकाला उपचारासाठी परळीला रवाना केले. सोनपेठ पोलीस ठाण्याचे सपोनि श्रीनिवास भिकाने, सपोउपनि देवराव मुंडे, बळीराम करवर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यापूर्वी दि. १३ डिसेंबर रोजी गंगाखेड- परळी रस्त्यावर या घटनास्थळापासून जवळ असलेल्या निळा शिवारात हायवा टिप्पर व ऑटोच्या अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

Web Title: Woman dies on the spot after being hit by a tractor; Auto driver seriously injured