शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

कुठे विश्‍व हरवले कळले ना मला..

By admin | Published: November 11, 2014 3:39 PM

जग त्यांच्यासाठी, उमलले ना मन माझे, माझे मनु कोणाला उमजेना मनाला... कुठे विश्‍व हरवले कळले ना मला... दूरच्या गावी येईल का कोणी, माझ्या आनंदात नाचेल का

भारत दाढेल/ नाांदेड
जग त्यांच्यासाठी, उमलले ना मन माझे, माझे मनु कोणाला उमजेना मनाला... कुठे विश्‍व हरवले कळले ना मला... दूरच्या गावी येईल का कोणी, माझ्या आनंदात नाचेल का कोणी.'.. भौतिक सुखात मग्न झालेल्या समाजाला जाणिवांच्या स्पर्शाने पुलकित करण्यासाठी व वंचितांच्या जगण्याला आधार देण्यासाठी प्रथेप्रमाणे यंदाही आनंदवन मित्र- परिवाराने दिवाळी स्नेहमिलनाचा कार्यक्रम साजरा करून मानवतेचा संदेश दिला. बजाज गॅलेक्सी मॉलसमोरील उंच, उंच इमारतींच्या शेजारी रविवारी रात्री संपूर्ण परिसर रोषणाईने नटला होता. प्रवेशद्वारापासून काढलेल्या रांगोळ्यांनी अन् भव्य मंचावर सादर होत असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने सर्वांचेच मन प्रसन्न झाले. नेरली कुष्ठधाम व संध्याछाया वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, सुमन बालगृहातील अनाथ मुली, परितक्त्या महिला या सर्वांना विशेष आमंत्रण देवून त्यांच्यासाठी ही दिवाळी आनंदवन मित्र परिवाराने आयोजित केली होती. मनोरंजनासोबतच भोजन व दिवाळीची भेट देवून या पाहुण्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही केली. गतवर्षी हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवित देगलूरनाका येथे दिवाळी स्नेह- मिलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची चर्चा शहरभर झाली होती. यंदाही आनंदवन मित्रपरिवाराने वंचितांच्या चेहर्‍यावरील आनंदाचे क्षण टिपण्यासाठी हा भव्य कार्यक्रम घेतला. कार्यक्रमाची सुरूवातच वैशिष्टपूर्ण होती. अध्र्या रात्री नांदेडकरांना जागे करून खडा पहारा देणारा व जागते रहो...चा पुकारा करणारा गोरखा मंचावर बोलावून त्यांच्याच हस्ते स्नेहमिलनाचे दीप- प्रज्ज्वलन केले. एरवी दर महिन्याला दहा, वीस रूपयांची मागणी करणारा गोरखा प्रथमच मंचावर गेल्याने नेमके काय करायचे असते, या विचाराने गोंधळला. दुसरीकडे त्याच्या चेहर्‍यावर हर्षही ओसंडून वाहत होता. स्थानिक कलावंतांनी उपस्थिांचे मनोरंजन करीत नृत्य, गायन, विनोद सादर करून सर्वांची मने जिंकले. तेव्हा समोरच्या रांगेत बसलेल्या उपेक्षित, वंचितांना आमच्यासाठीच का एवढा अट्टाहास, असा प्रश्न पडत असावा. शब्दांची उधळण करीत आपल्या भावनांचा आविष्कार प्रकट करताना निवेदकाचे मनही भरून आले होते. सर्वधर्मीय पाहुण्यांच्या स्वागताला आनंदवन मित्र परिवाराच्या सदस्यांनी कोणतीच कमी ठेवली नाही. डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटात काम करणार्‍या नांदेड येथील पाच कलावंतांचा गौरव या मंचावर करण्यात आला.