फर्निचरच्या दुकानासह गोदामाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:13 IST2021-07-05T04:13:10+5:302021-07-05T04:13:10+5:30

जिंतूर रोडवर गुलाम मुस्तफा (वय ६५,रा.दर्गा रोड) यांचे मागील पंधरा वर्षापासून खान फर्निचर नावाचे दुकान आहे. या दुकानामध्ये लाकडी ...

Warehouse fire with furniture shop | फर्निचरच्या दुकानासह गोदामाला आग

फर्निचरच्या दुकानासह गोदामाला आग

जिंतूर रोडवर गुलाम मुस्तफा (वय ६५,रा.दर्गा रोड) यांचे मागील पंधरा वर्षापासून खान फर्निचर नावाचे दुकान आहे. या दुकानामध्ये लाकडी साहित्य तसेच फर्निचर, तयार केलेले दरवाजे व अन्य सामान होते. शनिवारी रात्री गुलाम मुस्तफा हे दुकान बंद करून घरी गेल्यानंतर रविवारी पहाटे चारच्या सुमारास अचानक आग लागल्याचे त्यांना दुकानाशेजारी झोपलेल्या एका कारागिराने फोन करुन कळविले. यानंतर अग्निशमन दलाच्या वाहनाने घटनास्थळी पोहोचून सकाळी सहा वाजेपर्यंत आग विझविली. मात्र, यामध्ये सर्व साहित्य जळून खाक झाले. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी रविवारी सकाळी घटनास्थळी भेट दिली. दुपारपर्यंत घटनेचा पंचनामा व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया झाली नव्हती. तसेच याच दुकानाशेजारी असलेल्या एका गोडाऊनला आग लागली. यामुळे गोडाऊनमधील साहित्य जळाले. दोन्ही दुकानाच्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Web Title: Warehouse fire with furniture shop