भामट्यांनी पळविल्या वृद्ध महिलेच्या हातातील अंगठ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:15 IST2021-03-22T04:15:59+5:302021-03-22T04:15:59+5:30

गंगाखेड : अनोळखी तीन भामट्यांनी रस्त्याने चालणाऱ्या वृद्ध महिलेच्या हातातील दोन अंगठ्या पळविल्याची घटना २० मार्च रोजी सकाळी १० ...

The thumbs of an old woman's hand snatched by vagrants | भामट्यांनी पळविल्या वृद्ध महिलेच्या हातातील अंगठ्या

भामट्यांनी पळविल्या वृद्ध महिलेच्या हातातील अंगठ्या

गंगाखेड : अनोळखी तीन भामट्यांनी रस्त्याने चालणाऱ्या वृद्ध महिलेच्या हातातील दोन अंगठ्या पळविल्याची घटना २० मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शहरातील परळी रस्त्यावर घडली. याप्रकरणी ३ अनोळखी भामट्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगाखेड शहरातील विद्यानगर येथील रहिवासी सुरेखा ओमप्रकाश ओझा (७१) या २० मार्च रोजी सकाळी जेवणाचा डबा घेऊन परळी नाक्यावर पतीकडे जात होत्या. परळी रस्त्यावरील लक्ष्मीनगर कॉर्नरवर उभ्या असलेल्या अनोळखी तीन भामट्यांपैकी दोघांनी त्यांना रस्त्यात थांबवून तिसऱ्या व्यक्तीकडे नेले. तेव्हा या तिघांनी वृद्ध महिलेच्या हाताली अंगठ्या काढून पळ काढला. याप्रकरणी फिर्यादी सुरेखा ओमप्रकाश ओझा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास दीपक भारती करीत आहेत.

Web Title: The thumbs of an old woman's hand snatched by vagrants