पिंप्रुळा पाटीवरही विद्यार्थ्यांनी थांबविली बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:17 IST2021-02-12T04:17:02+5:302021-02-12T04:17:02+5:30

पिंप्रुळा येथील अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी सेलू येथे दररोज ये-जा करतात. लाॅकडाऊननंतर सुरू झालेल्या एसटी बसेस पिंप्रुळा पाटीवर थांबत ...

The students also stopped the bus at Pimprula Pati | पिंप्रुळा पाटीवरही विद्यार्थ्यांनी थांबविली बस

पिंप्रुळा पाटीवरही विद्यार्थ्यांनी थांबविली बस

पिंप्रुळा येथील अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी सेलू येथे दररोज ये-जा करतात. लाॅकडाऊननंतर सुरू झालेल्या एसटी बसेस पिंप्रुळा पाटीवर थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेक वेळा विद्यार्थ्यांना सेलूत शाळेत जाण्यासाठी खासगी वाहनांचा सहारा घ्यावा लागत होता. संबंधित आगार प्रमुखांना याबाबत पालकांनी वारंवार बस थांबविण्याची विनंती करूनही बस थांबत नव्हती. अखेर गुरुवारी विद्यार्थांनीच सकाळी १० वाजता बससमोर येऊन पिंपुळा पाटीवर बस थांबविली. यावेळी कंस मानमोडे, इंद्रजित शेरे, रमेश शेरे, प्रल्हाद गिरी, विष्णू आठवे यांची उपस्थिती होती. जवळपास दीड तास बस थांबविण्यात आली. याबाबत सेलू पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मध्यस्थी करून विद्यार्थ्यांची समजूत काढली. त्यानंतर त्यांना सेलू येथे वाहतूक नियंत्रकांकडे आणण्यात आले. वाहतूक नियंत्रकांनी त्यांना बस थांबा देण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आगार प्रमुख, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदने दिली.

Web Title: The students also stopped the bus at Pimprula Pati