शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

कृषी स्वावलंबनच्या वीज पुरवठ्यासाठी जि.प., महावितरणची विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:50 IST

परभणी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्र्गत अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील लभार्थ्यांना सिंचन विहिरीवर वीज पुरवठा देण्यासाठी जिल्हा ...

परभणी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्र्गत अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील लभार्थ्यांना सिंचन विहिरीवर वीज पुरवठा देण्यासाठी जिल्हा परिषद व महावितरणच्या वतीने १२ ते १४ जानेवारी दरम्यान जिल्हा परिषदेत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भातील निर्णय सोमवारी जि.प.मध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०१७-१८ पासून राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना नवीन विहीरीसाठी २ लाख ५० हजार रुपये तर इनर बोअरवेलसाठी २० हजार, पंपसेटसाठी २५ हजार, वीज जोडणीसाठी १० हजार रुपये, शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी १ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते. परभणी जिल्हा परिषदेने २०१७-१८ या वर्षांपासून या योजनेंतर्गत लाभार्थ्यांची निवड केली. त्यानंतर लाभार्थ्यांनी विहिरीही तयार केल्या; परंतु महावितरणकडून त्यांना विहिरीवर मोटार बसविण्यासाठी नव्याने वीज जोडणी देण्यात आली नाही. त्यामुळे अनेक लाभार्थी विहिर असूनही पिकांना पाणी देऊ शकत नव्हते. यासंदर्भात काही लाभार्थ्यांनी याबाबत कॉंग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी सिध्दार्थ हत्तिअंबीरे यांच्याकडे हा विषय मांडला. त्यानंतर सोमवारी हत्तिअंबीरे, सुधीर कांबळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांची जिल्हा परिषदेत भेट घेतली. त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडला. त्यानंतर टाकसाळे यांनी याबाबत सकारात्मकता दाखवत महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रविण अन्नछत्रे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अन्नछत्रे तातडीने जिल्हा परिषदेत आले. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा कृषी विकास अधिकारी ममदे यांची उपस्थिती होती.यावेळी झालेल्या चर्चेत या योजनेतील लाभार्थ्यांचा प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्यावर निर्णय घेण्यात आला.

जिल्हा परिषदेत विशेष शिबीर

ज्या लाभार्थ्यांना महावितरणची वीज जोडणी मिळाली नाही. त्या सर्व लाभार्थ्यासाठी १२ ते १४ जानेवारी असे तीन दिवस जिल्हा परिषदेत विशेष शिबीर घेऊन त्यांचे वीज जोडणीचे ऑनलाईन अर्ज दाखल करून देण्याचे निश्चित करण्यात आले. यासाठी जिल्हा परिषद व महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष मोहीम राबवण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे आता गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेला वीज जोडणीचा प्रश्न यानिमित्ताने निकाली निघणार आहे.