धक्कादायक ! निवडणुकीसाठी नियुक्त अभियंत्याचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 02:36 PM2021-01-07T14:36:23+5:302021-01-07T14:37:43+5:30

पूर्णा येथील शाखा अभियंता पांडुरंग सखाराम मोरे ग्रामपंचायत निवडणुकीच्या कर्तव्यावर असताना ५ जानेवारी रोजी त्यांचा मृतदेह बेवारस अवस्थेत पूर्णा नदीच्या पुलाखाली आढळला.

Shocking! Suspected death of an engineer appointed for election | धक्कादायक ! निवडणुकीसाठी नियुक्त अभियंत्याचा संशयास्पद मृत्यू

धक्कादायक ! निवडणुकीसाठी नियुक्त अभियंत्याचा संशयास्पद मृत्यू

Next
ठळक मुद्दे निवडणूक कामात कर्तव्यावर असताना एका अभियंत्याचा संशयास्पद मृत्यू होणे ही बाब खेददायक आहे. तेव्हा या प्रकाराची चौकशी करून संबंधितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी

पूर्णा (जि. परभणी) : पूर्णा ते ताडकळस या रस्त्यावरील पूर्णा नदीच्या कोरड्या पात्रात निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या पी. एम. मोरे या अभियंत्याचा मृतदेह ५ जानेवारी रोजी सायंकाळी आढळला. या संशयास्पद मृत्यूमुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे. 

पूर्णा नदीच्या कोरड्या पात्रात एक व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत पडली असल्याची माहिती पूर्णा पोलिसांना ५ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मिळाली. पोलीस कर्मचाऱ्यांनी नदीपात्रात उतरून पाहणी केली असता पूर्णा येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता पी. एम. मोरे यांचा हा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. सध्या त्यांची नेमणूक निवडणूक कामासाठी करण्यात आली आहे. मोरे यांचा मृत्यू नेमका कसा झाला? हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

चौकशी करून खुनाचा गुन्हा नोंदवा
पूर्णा येथील शाखा अभियंता पांडुरंग सखाराम मोरे ग्रामपंचायत निवडणुकीच्या कर्तव्यावर असताना ५ जानेवारी रोजी त्यांचा मृतदेह बेवारस अवस्थेत पूर्णा नदीच्या पुलाखाली आढळला. निवडणूक कामात कर्तव्यावर असताना एका अभियंत्याचा संशयास्पद मृत्यू होणे ही बाब खेददायक आहे. तेव्हा या प्रकाराची चौकशी करून संबंधितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष प्रभाकर भडंगे, कार्याध्यक्ष संभाजी वागतकर, हरिभाऊ गुव्हाडे, सीताराम ठाकरे, बापूराव बर्गे, विजय बेले, भगीरथ मिरासे, आदींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Web Title: Shocking! Suspected death of an engineer appointed for election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.