शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

धक्कादायक ! ३ खाजगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांकडून ५१ लाख उकळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 6:23 PM

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी या रुग्णालयाच्या व्यवस्थापनांना पत्र पाठवून अतिरिक्त वसूल केलेली रक्कम संबंधित रुग्णांना परत करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देसमितीच्या तपासणीतील निष्कर्षआदेशानुसार रुग्णालयांची तपासणी

परभणी : जिल्ह्यातील तीन खाजगी रुग्णालयांनी कोरोनाबाधित रुग्णांकडून उपचारासाठी अतिरिक्त ५१ लाख रुपयांची रक्कम वसूल केल्याची  बाब तपासणीत समोर आली असून, ही रक्कम संबंधित रुग्णांना परत करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. 

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शासकीय रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयांमध्येही बाधित रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली होती. त्यानुसार काही खाजगी रुग्णालयांमध्ये उपचाराची ही सुविधा निर्माण करण्यात आली. मात्र शासनाने ठरवून दिलेल्या रक्कमेपेक्षा अधिक रक्कम रुग्णांकडून वसूल केली जात असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाल्यानंतर या प्रकरणात चौकशीसाठी एका समितीची स्थापना करण्यात आली.

प्राप्त तक्रारीनुसार या समितीने परभणी शहरातील खाजगी रुग्णालयांच्या अभिलेखांची तपासणी केली असता ३ खाजगी रुग्णालयांनी शासकीय दराच्या तुलनेत रुग्णांकडून सुमारे ५१ लाख रुपयांची रक्कम वसूल केल्याची बाब तपासणीत स्पष्ट झाली. तपासणीसाठी स्थापन केलेल्या समितीने हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केल्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी या रुग्णालयाच्या व्यवस्थापनांना पत्र पाठवून अतिरिक्त वसूल केलेली रक्कम संबंधित रुग्णांना परत करुन तसा अहवाल पाठविण्याचे निर्देश काही दिवसांपूर्वी दिले आहेत. सध्यास्थितीत तरी ही रक्कम या रुग्णालयांनी परत केलेली नाही.

समितीच्या तपासणीत काय आढळले?कोरोनाबाधित रुग्णांकडून शासकीय दरापेक्षा अधिक रक्कम वसूल केली जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर या प्रकरणात समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने तीन रुग्णालयातील बिलांच्या अभिलेखांची तपासणी केली. त्यात प्राईम हॉस्पिटलमध्ये १२ लाख ७७ हजार ४८८ रुपये रुग्णांकडून अधिक वसूल केले. त्याचप्रमाणे चिरायू हॉस्पिटलने ३२ लाख ४५ हजार ९१० रुपये तर परभणी आयसीयू या रुग्णालयाने ५ लाख ६७ हजार ९०० रुपये रुग्णांकडून अतिरक्त वसूल केल्याचे अहवालात म्हटले आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांतील रुग्णांच्या बिलांची समितीने तपासणी केली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांकडून वसूल केलेली अतिरिक्त रक्कम रुग्णांना परत करण्याच्या सूचना खाजगी रुग्णालयांना केल्या आहेत. रुग्णालयांनी ही रक्कम रुग्णांना परत करणे बंधनकारक आहे. या संदर्भात रुग्णालयांकडे पाठपुरावा सुरू आहे.-दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी

आदेशानुसार रुग्णालयांची तपासणीजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहरातील खाजगी कोरोना रुग्णालयांची तपासणी केली. त्यात ज्या बाबी आढळल्या त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. रुग्णालयांनी अतिरिक्त वसूल केलेली रक्कम रुग्णांना परत करायला हवी. रुग्ण ही रक्कम स्वीकारत नसतील तर कोविड-१९ साठी शासनाकडे जमा करण्याचे आवश्यक आहे.-ज्योती बगाटे, प्रमुख चौकशी अधिकारी.

टॅग्स :parabhaniपरभणीcorona virusकोरोना वायरस बातम्या