शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

परभणीकरांचे स्वप्न लवकरच होणार पूर्ण : बहुप्रतिक्षीत नाट्यगृहाच्या बांधकामाला झाली सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 23:54 IST

जिल्हावासियांची अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या अद्यायवत नाट्यगृहाच्या बांधकामाला सुरुवात झाली असून, लवकरच परभणीतील सांस्कृतिक प्रेमी नागरिकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे़ हे नाट्यगृह दर्जेदार आणि अद्यायवत असेल, अशी माहिती आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हावासियांची अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या अद्यायवत नाट्यगृहाच्या बांधकामाला सुरुवात झाली असून, लवकरच परभणीतील सांस्कृतिक प्रेमी नागरिकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे़ हे नाट्यगृह दर्जेदार आणि अद्यायवत असेल, अशी माहिती आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी दिली़परभणी शहरातील नटराज रंग मंदिराची दुरवस्था झाल्यानंतर शहरवासियांना सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यासाठी नाट्यगृह उपलब्ध नसल्याने गैरसोयीला सामोरे जावे लागत होते़ शहरात दर्जेदार असे नाट्यगृह असावे, अशी शहरवासियांची मागणी होती़ ही मागणी लक्षात घेऊन आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी नाट्यगृहासाठी पाठपुरावा सुरू केला़ त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आणि शहरात नाट्यगृहाच्या उभारणीसाठी शासनाने निधी मंजूर केला़ शासनाच्या मुलभूत सोयी, सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेंतर्गत येथील स्टेडियम परिसरातील बचत भवनमध्ये नाट्यगृहाची इमारत उभी राहणार असल्याची माहिती आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी दिली़१८ कोटी १६ लाख ३९ हजार रुपये या नाट्यगृहाच्या उभारणीसाठी लागणार असून, त्यापैकी १० कोटी रुपयांचा निधी प्रत्यक्ष उपलब्ध झाला आहे़ परभणी शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या या नाट्यगृहाच्या उभारणीसाठी अनेक बारकावे लक्षात घेऊन सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत़ त्यात खालच्या मजल्यावर अद्यायवत प्रवेशद्वार, सुसज्ज उपहारगृह, ग्रीन रुम, स्वच्छतागृह, वरच्या मजल्यावर स्वतंत्र बालकणी कक्ष, गेस्ट रुम, कॉन्फ्रन्स हॉल, प्रशस्त लॉबी, स्वच्छतागृह असणार आहे़ या व्यतिरिक्त दुसºया मजल्यावर ७ हजार २६३ चौरस फुट आकाराची आर्ट गॅलरी उभारण्यात येणार आहे़ परभणी जिल्ह्यातील विविध कलावंतांच्या कलाकृतीचे प्रदर्शन व त्यांच्या कलागुणांचे दर्शन व्हावे, यासाठी पुणे येथील बालगंधर्व कला दालनाच्या धरतीवर ही आर्ट गॅलरी उभारली जाणार आहे़ या नाट्यगृहाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली असून, पुणे येथील निखील कन्स्ट्रक्शन कंपनी हे काम करीत आहे़ या कंपनीला बांधकाम करण्यासाठी दोन वर्षांची मुदत दिली असल्याची माहिती आ़डॉ़ राहुल पाटील यांनी दिली़एक हजार आसन क्षमतेची सुविधा४परभणी शहरात उभारण्यात येणाºया या नाट्यगृहाची आसन क्षमता एक हजार एवढी असून, ७९ हजार ६०० चौरस फुट क्षेत्रावर नाट्यगृहाची उभारणी केली जाणार आहे़४ त्यापैकी ४७ हजार ५२९ चौरस फुट क्षेत्रफळावर प्रत्यक्ष बांधकाम केले जाणार आहे़ त्यामध्ये १३ हजार ७१९ चौरस फुटाची जागा वाहन तळासाठी ठेवण्यात आली आहे़४परभणीत उभारले जाणारे हे नाट्यगृह शहराच्या वैभवात भर घालणारे ठरेल, अशा पद्धतीने बांधकाम केले जाणार आहे़, अशी माहिती आ.डॉ.पाटील यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीMLAआमदार