शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :मळी टाकण्यावरून जोरदार मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 00:49 IST

शेतात मळी टाकण्याच्या कारणावरून टँकर चालक आणि मालकामध्ये मारहाण झाल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास परळी नाका परिसरात घडली़ या प्रकरणी ८ जणांविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): शेतात मळी टाकण्याच्या कारणावरून टँकर चालक आणि मालकामध्ये मारहाण झाल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास परळी नाका परिसरात घडली़ या प्रकरणी ८ जणांविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे़मळीने भरलेला टँकर परळी रस्त्यावरील बन पिंपळा शिवारातील एका शेतात रिकामा करून येत असताना पांढऱ्या रंगाची कार्पिओ गाडी घेवून आलेल्या ५ ते ६ जणांनी आमच्या मालकाच्या शेतात मळी का टाकली? या कारणावरून टँकर चालक व त्याच्यासोबत असलेल्या खमरोद्दीन मंजूर अली खान यांना शिवीगाळ केली़ त्यानंतर हे दोघेही त्या ठिकाणावरून निघून गेले़त्यानंतर परत परळी नाका परिसरात असलेल्या एका आॅटोमोबाईल्सच्या मागील बाजुने बबन पाळवदे यांच्या गाडीत आलेल्या ५ ते ६ जण व दुचाकीने आलेल्या दोघांनी काठी, लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले़ या मारहाणीत दोघेही जखमी झाल्याने त्यांना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ उपचार सुरू असताना खमरोद्दीन मंजूर अली खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी आठ जणांविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे़ पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल घोगरे, राजकुमार बंडेवाड तपास करीत आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी