शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पोलीस दलातील २२ अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 00:54 IST

आगामी विधानसभा निवडणुका आणि प्रशासकीय कारणावरून जिल्ह्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक अशा २२ अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांनी काढले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आगामी विधानसभा निवडणुका आणि प्रशासकीय कारणावरून जिल्ह्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक अशा २२ अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांनी काढले आहेत़११ सप्टेंबर रोजी हे आदेश काढण्यात आले असून, त्यात गंगाखेड येथील सहायक पोलीस निरीक्षक भागोजी चोरमले यांची पोलीस अधीक्षकांचे वाचक या पदावर, जिंतूर येथील सुनील गिरी यांची उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे वाचक म्हणून, चारठाणा पोलीस ठाण्यातील अजयकुमार पांडे यांची गंगाखेड येथे, नवा मोंढा पोलीस ठाण्यातील प्रवीण दिनकर यांची उपविभागीय पोलीस अधिकारी परभणी शहर यांचे वाचक म्हणून, याच पोलीस ठाण्यातील सविता कलटवार यांची कोर्ट पैरवीसाठी तर मानवत येथील पोलीस उपनिरीक्षक रवि मुंडे यांची जिंतूर येथे, नवा मोंढा पोलीस ठाण्यातील शिवशंकर मनाळे यांची शहर वाहतूक शाखेत, कोतवाली पोलीस ठाण्यातील नंदलाल चौधरी यांची उपविभागीय पोलीस अधिकारी परभणी ग्रामीण यांचे वाचक म्हणून, पिंपळदरी पोलीस ठाण्यातील संतोष मुपडे यांची परभणी येथे नानलपेठ पोलीस ठाण्यात, जिंतूर पोलीस ठाण्यातील दत्ता कालगुले यांची पिंपळदरी येथे, बामणी येथील सुनील पल्लेवाड यांची नवा मोंढा पोलीस ठाण्यात तर जिंतूर येथील बाबासाहेब लोखंडे यांची परभणी येथे आर्थिक गुन्हा शाखेत बदली करण्यात आली आहे़४अन्य एका आदेशावरून १० अधिकाºयांच्या बदल्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये सेलू येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत जमादार यांची सेलू येथे, शहर वाहतूक शाखेतील गजेंद्र सरोदे यांची सेलू येथे, कोतवाली पोलीस ठाण्यातील गुलाब बाचेवाड यांची सायबर सेलमध्ये, नानलपेठ पोलीस ठाण्यातील अभय दंडगव्हाण यांची जिंतूर येथे, कोर्ट पैरवीचे शिवदास लहाने यांची ताडकळस येथे, नियंत्रण कक्षातील कल्पना राठोड यांची पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्य कक्षात, नानलपेठ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हनुमंत नागरगोजे यांची बामणी येथे, उपविभागीय पोलीस अधिकारी परभणी शहर यांचे वाचक अनिल आदोडे यांची दैठणा येथे, नानलपेठ पोलीस ठाण्यातील सचिन द्रोणाचार्य यांची गंगाखेड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे वाचक म्हणून तर महिला सहाय्यक कक्षातील उपनिरीक्षक सुप्रिया केंद्रे यांची कोतवाली पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसTransferबदली