शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : रेल्वे फाटक पाच तास बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 00:55 IST

रेल्वे रुळाखाली नवीन स्लीपर टाकण्याच्या कामासाठी रविवारी शहरातील कोद्री रेल्वे फाटक पाच तास बंद ठेवण्यात आले होते. यामुळे शहरातील रेल्वे फाटकाच्या दक्षिण भागात राहणाऱ्या रहिवाशांना आपली वाहने फाटकाजवळ सोडून पायी प्रवास करावा लागल्याचे पहावयास मिळाले.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी ) :रेल्वे रुळाखाली नवीन स्लीपर टाकण्याच्या कामासाठी रविवारी शहरातील कोद्री रेल्वे फाटक पाच तास बंद ठेवण्यात आले होते. यामुळे शहरातील रेल्वे फाटकाच्या दक्षिण भागात राहणाऱ्या रहिवाशांना आपली वाहने फाटकाजवळ सोडून पायी प्रवास करावा लागल्याचे पहावयास मिळाले.गंगाखेड येथून परभणी- परळीकडे जाणाºया रेल्वे रुळाचे काम सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी म्हणजेच १९९४ मध्ये करण्यात आले होते. रेल्वेच्या रुळाखाली असलेले सिमेंटचे स्लीपर हे वीस वर्षानंतर बदलणे अनिवार्य असल्याने रेल्वे प्रशासनातील पूर्णा येथील पी.डब्ल्यू.आय. सुबोधकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून ते दुपारी ४ वाजेदरम्यान शहरातील कोद्री रेल्वे फाटक बंद ठेवले. या दरम्यान या कालावधीत वडगाव रेल्वे मार्गावर २८८ मीटरपर्यंतचे स्लीपर बदलण्यात आले आहेत. यामुळे सकाळी ११ वाजता परळीकडे जाणारी अकोला - परळी रेल्वे काही वेळ गंगाखेड रेल्वेस्थानकावर थांबविण्यात आली होती. शहरातील कोद्री रेल्वे फाटक सुमारे पाच तास बंद राहिल्याने शहराच्या दक्षिण भागातील ममता कॉलनी, प्राध्यापक कॉलनी, जनाबाई नगर, कृष्णा नगर, अजिंठा नगर, गौतम नगर, जायकवाडी वसाहत, भंडारी कॉलनी याबरोबर अकोली, खादगाव, कोद्री, बडवणी, डोंगरगाव, माखणी, वाळके पोखर्णी, अंतरवेली मार्गे धमार्पुरी, लातूरकडे जाणारी वाहतूक बंद झाली होती. यामुळे शहराच्या दक्षिण भागातील वसाहतीत राहणाºया नागरिकांना रेल्वे फाटकाजवळ आपली वाहने सोडून पायी प्रवास करावा लागला. रेल्वे फाटकाच्या दोन्ही बाजूने वाहनांची मोठी गर्दी झाली होती.

टॅग्स :parabhaniपरभणीrailwayरेल्वे