शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : वाळू चोरी प्रकरणी एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 00:55 IST

तालुक्यातील उमरा येथील गोदावरी नदीच्या पात्रातून ८०० ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील डिग्रस (ता़ परळी) येथील सरपंचास पाथरी पोलिसांनी १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी अटक केली आहे़ या प्रकरणात १७ लाख रुपयांच्या वाळू चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): तालुक्यातील उमरा येथील गोदावरी नदीच्या पात्रातून ८०० ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील डिग्रस (ता़ परळी) येथील सरपंचास पाथरी पोलिसांनी १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी अटक केली आहे़ या प्रकरणात १७ लाख रुपयांच्या वाळू चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे़पाथरी तालुक्यातील उमरा शिवारात गट नंबर २९१ मधील वाळू घाटावरून अंदाजे ८०० ब्रास वाळू उत्खनन आणि वाहतूक केल्या प्रकरणी नायब तहसीलदार संदीप साखरे यांच्या फिर्यादीवरून १० सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्यातील डिग्रस (ता़ परळी) येथील सरपंच सुभाष नाटकर यांच्या विरोधात पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ डिग्रस येथील सरपंचांनी २० जून ते १४ जुलै २०१९ या कालावधीत उमरा येथील दोन वाळू घाटातून ८०० ब्रास वाळू (बाजार मूल्य १७ लाख २४ हजार) उत्खनन आणि वाहतूक केल्याचा अहवाल तलाठी ए़व्ही़ निरडे आणि मंडळ अधिकारी गोवंदे यांनी पाथरी येथील तहसीलदारांना सादर केला होता़ त्यानंतर १० सप्टेंबर रोजी डिग्रस येथील सरपंच सुभाष नाटकर यांच्या विरोधात नायब तहसीलदारांच्या फिर्यादीवरून पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़१३ सप्टेंबर रोजी पाथरी पोलिसांनी परळी तालुक्यातील डिग्रस येथील सरपंच सुभाष नाटकर यांना गावात जाऊन अटक केली़ त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी पाथरी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे़, अशी माहिती पोलीस निरीक्षक डी़डी़ शिंदे यांनी दिली़या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अहिरे यांच्याकडे देण्यात आला आहे़पाथरी तालुक्यात वाळू घाटांचे लिलाव झाले नसतानाही मोठ्या प्रमाणात वाळुचा उपसा होत आहे़ महसूल प्रशासनाने याकडे लक्ष देऊन वाळूचा अवैध उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूgodavariगोदावरीriverनदीPoliceपोलिस