शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
4
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
5
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
6
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
7
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
8
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
9
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
11
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
12
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
13
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
14
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
15
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
16
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
17
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
18
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
19
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
20
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक

परभणी : टँकरने ओलांडला पाऊणशेचा आकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 23:46 IST

जिल्ह्याच्या दहा वर्षांच्या इतिहासात प्रथमच पाणीटंचाई सर्वाधिक गंभीर झाली आहे़ यावर्षी सुमारे पाऊणशेहून अधिक टँकरच्या सहाय्याने टंचाईग्रस्त गावांना जिल्हा प्रशासन पाणीपुरवठा करीत असून, दररोज टंँकरच्या संख्येत वाढ होत असल्याने पाऊस दाखल होईपर्यंत टँकरचे शतक होते की काय? अशी गंभीर परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्याच्या दहा वर्षांच्या इतिहासात प्रथमच पाणीटंचाई सर्वाधिक गंभीर झाली आहे़ यावर्षी सुमारे पाऊणशेहून अधिक टँकरच्या सहाय्याने टंचाईग्रस्त गावांना जिल्हा प्रशासन पाणीपुरवठा करीत असून, दररोज टंँकरच्या संख्येत वाढ होत असल्याने पाऊस दाखल होईपर्यंत टँकरचे शतक होते की काय? अशी गंभीर परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे़संपूर्ण मराठवाड्यात पाणीटंचाई दरवर्षीच्या उन्हाळ्यात नागरिकांना सतावते़ परभणी जिल्ह्यातही सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याने पाणीटंचाई निर्माण होते़ मात्र टंचाईची ही तीव्रता मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असते़ यावर्षी परभणी जिल्ह्याने हा अपवाद मोडित काढला असून, जिल्ह्यातही पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे़ गोदावरी, पूर्णा, वाण, बोरणा, करपरा, दूधना या नद्यांच्या पात्रात केवळ कोरडी वाळू शिल्लक आहे़ भकास पडलेले हे पात्र आणि प्रमुख प्रकल्प गावतलावांनी तळ गाठल्याने टंचाईची तीव्रता वाढली असून, यंदा प्रथमच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टँकर सुरू करावेत लागत आहेत़शहरासह ग्रामीण भागात सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, टँकर आल्यानंतर ग्रामस्थांचा टँकरभोवती गराडा पडतो़ एक-दोन बॅलर पाणी टँकरच्या सहाय्याने उपलब्ध होत असून, हे पाणी चार ते पाच दिवस पुरविले जात आहे़ अनेक भागांत विकतच्या पाण्यावर ग्रामस्थांना दिवस काढावे लागत आहेत़ त्यामुळे पाणी टंचाईची तीव्रता शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अधिक गंभीर झाली आहे़नळ पुरवठा योजनांची दुरुस्ती विहीर, बोअरचे अधिग्रहण यासह टँकरद्वारे पाणीपुरवठा करून टंचाई शिथील करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करीत असले तरी दिवसेंदिवस टंचाई वाढत चालल्याने प्रशासनाचे हे प्रयत्न तोकडे पडत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती वाढली आहे. गाव परिसरात पाणी शिल्लक नसल्याने शेतातून पाणी आणावे लागत आहे. वाढती पाणी टंचाई लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने प्राधान्याने टंचाई निवारणाची कामे हाती घ्यावी, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.१०० टँकरचे नियोजनच्जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आॅक्टोबर महिन्यात सुमारे सहा महिन्यांच्या पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार केला होता़च्या आराखड्यामध्ये ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी किमान १०० टँकर लागतील, असा अंदाज बांधला होता़ या अंदाजानुसार जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ८५ टँकर सुरू करण्यात आले असून, लवकरच १०० टँकर सुरू करावे लागण्याची चिन्हे आहेत़च्जून महिन्यांपासून पावसाळ्याचे वेध लागतात. मात्र पाऊस वेळेवर झाला नाही तर संपूर्ण जून महिन्यांत टंचाई निवारणाची कामे जिल्हा प्रशासनाला करावी लागणार आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत मंजुरी दिलेली कामे तातडीने पूर्ण करणे गरजेचे झाले आहे.पाथरी तालुका टँकरमुक्तच्ग्रामीण भागात पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने टँकर सुरू केले असले तरी पाथरी तालुक्यात मात्र आतापर्यंत एकही टँकर सुरू झाले नाही़च्तालुक्याला यापूर्वी जायकवाडी प्रकल्पाचे पाणी मिळाले होते़ तसेच गोदावरी नदीपात्रावर बांधलेले दोन बंधारे या तालुक्यात असल्याने थोडेफार पाणी उपलब्ध होत आहे़च्या पाण्याच्या भरोस्यावर तालुक्यात आतापर्यंत एकही टँकर सुरू झाले नाही़पालम तालुक्यात सर्वाधिक टँकरच्आॅक्टोबर महिन्यापासून जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे़ साधारणत: जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा प्रशासनाने टंचाईग्रस्त गावांत टँकर सुरू केले़च्सद्यस्थितीला पालम तालुक्यात सर्वाधिक २३ टँकर सुरू आहेत़ तालुक्यातील १६ गावे आणि सहा वाड्यांना या टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे़च्गंगाखेड तालुक्यातील सहा गावे आणि तीन वाड्यांना १३ टँकर, जिंतूर तालुक्यातील १३ गावांना १३ टँकर, पूर्णा तालुक्यातील १२ गावांना १४ टँकर, सेलू तालुक्यातील ९ गावांना १०, सोनपेठ तालुक्यातील ५ गावांना ५, मानवत तालुक्यातील ६ गावांना ६, परभणी तालुक्यातील ३ गावांना एका टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाई