शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : आता घरपट्टी भरता येणार आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 00:06 IST

शहरातील मालमत्ताधारकांकडे घरपट्टी आणि पाणीपट्टी घरबसल्या भरण्याची सुविधा महानगरपालिका लवकरच उपलब्ध करुन देणार आहे. या धर्तीवर मनपाने प्रयत्न सुरु केले असून येत्या काही दिवसांत आॅनलाईन सुविधा कार्यान्वित केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील मालमत्ताधारकांकडे घरपट्टी आणि पाणीपट्टी घरबसल्या भरण्याची सुविधा महानगरपालिका लवकरच उपलब्ध करुन देणार आहे. या धर्तीवर मनपाने प्रयत्न सुरु केले असून येत्या काही दिवसांत आॅनलाईन सुविधा कार्यान्वित केली जाणार आहे.परभणी शहरामध्ये सुमारे ७० हजार मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांकडून घरपट्टी आणि पाणीपट्टी कराच्या स्वरुपात वसूल केली जाते. मात्र मागील काही वर्षांपासून घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीला थंड प्रतिसाद मिळत आहे. ही वसुली वाढावी. तसेच शहरातील नागरिकांची गैरसोय दूर व्हावी, या उद्देशाने मनपाने आॅनलाईन कर वसुली कार्यप्रणाली सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत मालमत्ताधारकांना घरबसल्या त्यांचा कर किती, याची माहिती मिळणार असून आॅनलाईन कर भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.या सुविधेची माहिती देण्यासाठी ८ नोव्हेंबर रोजी बी.रघुनाथ सभागृहात कर निरीक्षक आणि वसुली लिपिकांची कार्यशाळा पार पडली.आयुक्त रमेश पवार यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी मुख्यलेखाधिकारी गणपत जाधव, सहाय्यक आयुक्त अलकेश देशमुख, संगणकप्रमुख आदनान कादरी, नगरसचिव विकास रत्नपारखे, आॅनलाईन सुविधेसाठी नेमलेल्या सल्लागार एजन्सीचे अमोल डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कर निरीक्षक व वसुली लिपिकांनी त्यांच्याकडील वसुली वार्डची अद्ययावत माहिती, ज्यामध्ये मालमत्तांची संख्या, थकबाकीचा कालावधी, थकबाकी मागणी, चालू मागणी, एकूण मागणी आदी माहिती येत्या तीन दिवसांत सादर करावी, अशा सूचना आयुक्त रमेश पवार यांनी दिल्या आहेत.ही सर्व माहिती आॅनलाईन सॉफ्टवेअरमध्ये नोंदविणे, त्याची प्रिंट काढून ती अचूक आहे का? याची खात्री करुन प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देशही पवार यांनी कर्मचाऱ्यांना दिले आहेत.कर्मचाºयांना दिले प्रशिक्षणमालमत्ताकराची आॅनलाईन वसुली प्रणाली कशी आहे, तिचा वापर कसा करावा, याबाबतची प्रात्याक्षिकासह माहिती या कार्यशाळेत देण्यात आली. कर निरीक्षक व वसुली लिपिकांच्या शंकाचे निरसणही करण्यात आले. याशिवाय या आॅनलाईन प्रणालीबाबत सर्व लिपिक आणि कर निरीक्षकांना वैयक्तिक प्रशिक्षण दिले जाणार असून वसुलीसाठी लवकरच ३५ वसुली लिपिकांना मोबाईल टॅब दिले जाणार आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीonlineऑनलाइनTaxकर