शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : चार महिलांनी लंपास केली तीन लाखांची रोकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 22:46 IST

दुकानात कोणीही नसल्याची संधी साधून चार महिला चोरट्यांनी गल्ल्यातील ३ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना १७ मार्च रोजी घडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): दुकानात कोणीही नसल्याची संधी साधून चार महिला चोरट्यांनी गल्ल्यातील ३ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना १७ मार्च रोजी घडली आहे.पूर्णा पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार शहरातील आडत बाजारपेठेतील श्रीराम ट्रेडींग कंपनी या दुकानाचे मालक विशाल लक्ष्मीनारायण चितलांगे हे चहा पिण्यासाठी दुकानाच्या बाहेर गेले होते. यावेळी गल्ल्याची चावी तशीच राहीली. सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास चार महिला भिक मागण्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी आल्या. या महिलांनी दुकानात प्रवेश केला तेव्हा दुकानात कोणीही नसल्याची संधी साधत गल्ल्यातील रोख ३ लाख रुपये चोरून महिलांनी त्या ठिकाणाहून पोबारा केला. दुकान मालक विशाल चितलांगे हे दुकानात आल्यानंतर बऱ्याच वेळानंतर त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यामुळे त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सर्व घटनाक्रम दिसून आला.याबाबत शहरात चौकशी केली असता नवा मोंढा भागातून या महिला आॅटोरिक्षात बसून रेल्वेस्थानकापर्यंत गेल्या असल्याची माहिती आॅटोरिक्षा चालकाने पोलिसांना सांगितली. या प्रकरणी पूर्णा पोलिसांनी दोन पथकांची स्थापना केली असून, हे पथक वसमत व नांदेडकडे रवाना झाले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी