शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : काँग्रेसचे नगरसेवक गेले सहलीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 01:08 IST

येथील महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत फोडाफोडीचे राजकारण होऊ नये, यासाठी काँग्रेसचे नगरसेवक इतर जिल्ह्यात सहलीवर गेले आहेत. मंगळवारी सकाळी या अनुषंगाने मनपाच्या बी.रघुनाथ सभागृहात झालेल्या बैठकीत चर्चा झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत फोडाफोडीचे राजकारण होऊ नये, यासाठी काँग्रेसचे नगरसेवक इतर जिल्ह्यात सहलीवर गेले आहेत. मंगळवारी सकाळी या अनुषंगाने मनपाच्या बी.रघुनाथ सभागृहात झालेल्या बैठकीत चर्चा झाली होती.महानगरपालिकेच्या महापौरांची शुक्रवारी आयोजित विशेष सभेत निवड होणार आहे. महापौरपदासाठी काँग्रेसकडून अनिता सोनकांबळे, राष्ट्रवादीकडून डॉ.वर्षा खिल्लारे, गवळण रोडे आणि भाजपाकडून मंगल मुद्गलकर या चार नगरसेविकांचे अर्ज दाखल झाले आहेत.मनपात काँग्रेसचे बहुमत असले तरी पक्षाच्या नेत्यांना फोडाफोडीचे राजकारण होण्याची भीती वाटते. निवडणुकीच्या वेळी पक्षाकडून नगरसेवकांकरिता मतदानासाठी व्हीप काढला जाणार आहे. व्हीपच्या विरोधात जाणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई होऊ शकते, ही माहिती असतानाही कोणत्याही प्रकारचा धोका पत्करण्याची काँग्रेस श्रेष्ठींची इच्छा नाही. त्यामुळे मंगळवारी मनपाच्या बी.रघुनाथ सभागृहात काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आणि त्यांच्या नातेवाईकांची बैठक झाली. त्या बैठकीत पक्षाच्या नगरसेवकांना दोन दिवसांकरीता बाहेरगावी सहलीवर पाठविले जाण्यावर चर्चा झाल्याचे समजते. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी काँग्रेसचे अनेक नगरसेवक सहलीवर इतर जिल्ह्यात गेले.प्रारंभी काही नगरसेवकांनी सहलीवर जाण्यास विरोध केल्याचे समजते; परंतु काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.सुरेश वरपूडकर, गटनेते भगवानराव वाघमारे यांच्या मध्यस्थीनंतर हे नगरसेवकही सहलीत सहभागी झाल्याचे वृत्त आहे. त्यांच्यासमवेत सभागृह नेते भगवानराव वाघमारे हे आहेत. आता हे नगरसेवक शुक्रवारी सकाळीच परभणीत परत येण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीचे पक्ष पदाधिकारी आणि नगरसेवकांत मतभेदराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि काही नगरसेवक यांच्यामध्येच मतभेद निर्माण झाले असल्याचे समजते. नगरसेवकांमध्येही दोन गट निर्माण झाले आहेत. एक गट स्थानिक पक्षश्रेष्ठींच्या बाजूने आहे तर दुसरा गट पक्षश्रेष्ठींना दूर ठेवून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे समजते. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमधील परभणीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. आता या प्रकरणी पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात? कोणाचा अर्ज शेवटपर्यंत राहतो, हा उत्सुकतेचा विषय झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकcongressकाँग्रेस