शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : रस्त्याच्या डांबरीकरणासाठी नागरिकांनी केले आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:27 IST

उघडा महादेव ते कारेगाव रस्त्याचे डांबरीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी २३ नोव्हेंबर रोजी या भागातील अनेक वसाहतींमधील नागरिकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : उघडा महादेव ते कारेगाव रस्त्याचे डांबरीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी २३ नोव्हेंबर रोजी या भागातील अनेक वसाहतींमधील नागरिकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले.परभणी शहरातील उघडा महादेव ते कारेगाव रस्त्याची मागील अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. उघडा महादेव ते कारेगाव रस्ता हा वर्दळीचा रस्ता आहे़ रचना नगर, कपिल नगर, गोकुळ नगर, संघमित्र कॉलनी, सहारा कॉलनी, प्रियदर्शनी नगर, एमआयडीसी, कामगार वसाहत, अहिल्याबाई नगर, आंबेडकर चौक, ओयासिस माध्यमिक शाळा आदी वसाहती आणि शाळा आहेत़ त्यामुळे दररोज हजारो नागरिक या रस्त्यावरून वाहतूक करतात़ मात्र रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे पडले असून, त्यात पाणी साचले आहे़ त्याचा त्रास वयोवृद्ध नागरिक, विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे़ अनेक वेळा सायकलवरून पडून विद्यार्थी जखमी झाले आहेत़या संदर्भात महापालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतरही गांभिर्याने घेतले जात नाही़ याशिवाय सांडपाण्याची व्यवस्था, नाल्या, दिवाबत्ती, जलवाहिनी, स्वच्छता अशा अनेक समस्या निर्माण झाल्याने येथील नागरिकांनी २३ नोव्हेंबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानुसार शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास या आंदोलनास सुरुवात झाली. या भागातील अनेक नागरिकांनी आंदोलनात सहभाग नोंदवत रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनWomenमहिला