शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : कारवाईच्या मागणीसाठी भीम टायगर सेनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 00:50 IST

रमाई घरकूल आणि प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिक व्यवहार करून ठराविक लाभार्थ्यांनाच घरकुलाचा लाभ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी भीम टायगर सेनेने बुधवारी महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : रमाई घरकूल आणि प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिक व्यवहार करून ठराविक लाभार्थ्यांनाच घरकुलाचा लाभ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी भीम टायगर सेनेने बुधवारी महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले़महानगरपालिकेच्या वतीने रमाई घरकूल योजना राबविली जाते़ ही योजना राबवित असताना मातोश्री रमाबाई आंबेडकरनगर, संजय गांधी नगर, भीमनगर, साखला प्लॉट, शंकरनगर या भागात शासकीय नियम समोर करून योजनेतील काही लाभार्थ्यांना घरकूल मंजूर केले नाही़ परंतु, हेच शासकीय नियम डावलून काही भागात मात्र महानगरपालिकेच्या रमाई घरकूल योजनेतील अधिकारी, कर्मचाºयांनी आर्थिक व्यवहार करून लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिला आहे़ या अधिकाºयांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली़ परंतु, केवळ आश्वासनेच देण्यात आली आहेत़ आतापर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही़ त्यामुळे भीम टायगर सेनेच्या वतीने याच प्रश्नांवर बुधवारी महानगरपालिकेसमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले़दुपारी १़३० वाजेच्या सुमारास भीम टायगर सेनेचे पदाधिकारी, युवक मोठ्या संख्येने मनपा कार्यालयासमोर दाखल झाले़ यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली़ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त ठेवला होता़ दरम्यान, मनपाचे उपायुक्त गणपत जाधव, नगररचनाकार किरण फुटाणे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले़ या आंदोलनात युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़दरम्यान, जोपर्यंत संबंधित अधिकारी, कर्मचाºयांच्या संपत्तीची चौकशी होवून कारवाई होत नाही, तोपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला़

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनMuncipal Corporationनगर पालिका