Parbhani: 499 officers for health care | परभणी : आरोग्य सेवेसाठी १९२ अधिकारी

परभणी : आरोग्य सेवेसाठी १९२ अधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक उपकेंद्राच्या ठिकाणी कंत्राटी तत्त्वावरील समूदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश असून त्यानुसार परभणी जिल्ह्यात १९२ समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर या अधिकाºयांकडून ग्रामीण भागात प्रत्यक्ष कामकाज केले जाणार आहे़
ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यानंतर उपचार करण्याऐवजी या समस्याच निर्माण होवू नयेत, यासाठी समूदाय आरोग्य अधिकाºयांकडून वेळोवेळी समुपदेशन, उपचार केले जाणार आहेत़ त्यात योगा, प्राणायाम यासह इतर उपायांचा समावेश आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्राचे रुपांतर आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये केले जात आहे़ यासाठी औरंगाबाद येथील आरोग्य उपसंचालकांकडून बीएएमएस, बीएचयूएस, बीएस्सी नर्सिंग उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते़ २ फेब्रुवारी रोजी या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली़ त्यानंतर पात्र ठरलेल्या ३५१ उमेदवारांचे समूपदेशन परभणी येथे १५ फेब्रुवारी रोजी पार पडले़ वरिष्ठ कार्यालयातून पार ठरलेल्या उमेदवारांपैकी गुणानुक्रमे १९२ उमेदवारांची परभणी जिल्ह्यासाठी निवड करण्यात आली आहे़ या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व प्रशिक्षण केंद्राचे वाटप शनिवारी मध्यरात्रीपर्यंत चालले़
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एस़पी़ देशमुख, नोडल अधिकारी डॉ़ प्रकाश डाके, माता बाल संगोपन अधिकारी डॉ़ गणेश सिरसूलवार, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ रमेश खंदारे, डॉ़ कालिदास निरस यांच्यासह अधिकाºयांच्या उपस्थितीत पात्र समूदाय आरोग्य अधिकाºयांचे समूपदेशन करून त्यांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली़
परभणी जिल्ह्यात ३१ प्राथमिक आरोग्य केंद्र असून, २१५ उपकेंद्र आहेत़ त्यापैकी पहिल्या टप्प्यात १९२ उपकेंद्रासाठी समूदाय आरोग्य अधिकाºयांची नियुक्ती झाली आहे़ सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर हे अधिकारी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहेत़ त्यामुळे आरोग्य उपकेंद्र आणखी बळकट होवून ग्रामस्थांना आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे़
असंसर्गजन्य आजारांवर उपचार
४ग्रामीण भागामध्ये कर्करोग, मधुमेह, रक्तदाब यासारख्या असंसर्गजन्य आजारांवर आरोग्य केंद्रातच उपचार व्हावेत, या उद्देशाने समूदाय आरोग्य अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे़ या असंसर्गजन्य आजारांवर सामूदायिक वैद्यकीय अधिकाºयांकडून ग्रामीण भागातच उपचार व्हावेत, या उद्देशाने सामूदायिक वैद्यकीय अधिकाºयांच्या नियुक्त्या करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ त्यानुसार हे आरोग्य अधिकारी ग्रामीण भागामध्ये जनजागृतीबरोबरच उपचाराचेही कामकाज करणार आहेत़
विविध ठिकाणी होणार प्रशिक्षण
४निवडलेल्या १९२ समूदाय आरोग्य अधिकाºयांची नियुक्ती केल्यानंतर या अधिकाºयांना परभणी, हिंगोली, तुळजापूर, उस्मानाबाद आणि जळगाव येथील प्रशिक्षण केंद्रावर सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे़ नियुक्ती दिलेल्या उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार प्रशिक्षण केंद्रांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली़
या उद्देशाने राबविली योजना
४ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्र हे आरोग्य केंद्राबरोबरच आरोग्य वर्धिनी केंद्र बनावे़
४याचाच अर्थ आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आजार होवू नये, तसेच ग्रामस्थांचे आरोग्य सदृढ रहावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे़ कर्करोग, मधुमेह, रक्तदाब यासारखे आजार लवकर लक्षात येत नाहीत़
४दुसºया व तिसºया टप्प्यात हे आजार निदर्शनास येतात व त्यानंतर उपचार करणे अवघड होते़ हे आजार लवकर कळावेत, यासाठी समूदाय आरोग्य अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे़

Web Title: Parbhani: 499 officers for health care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.