शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : १७४ शिक्षकांना दिले नियुक्तीपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 00:41 IST

राज्य शासनाच्या पवित्र पोर्टल प्रणालीअंतर्गत प्राप्त झालेल्या यादीतील १७४ प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या वतीने नियुक्तीपत्र देण्यात आले असून १५ प्राथमिक शिक्षकांना पदवीधर पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्य शासनाच्या पवित्र पोर्टल प्रणालीअंतर्गत प्राप्त झालेल्या यादीतील १७४ प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या वतीने नियुक्तीपत्र देण्यात आले असून १५ प्राथमिक शिक्षकांना पदवीधर पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.राज्याच्या शिक्षण विभागाकडून पवित्र पोर्टल प्रणालीअंतर्गत जिल्हा परिषदेकडे मराठी माध्यमाच्या २०६ आणि उर्दू माध्यमाच्या ५ शिक्षकांची यादी प्राप्त झाली होती. जि.प.कडे मराठी माध्यमाची २०१ आणि उर्दू माध्यमाची ५ पदे रिक्त आहेत. प्राप्त झालेल्या यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली. त्यामध्ये ३१ उमेदवारांचे अर्ज अपात्र किंवा प्रलंबित ठेवण्यात आले. या उमेदवारांचे ११ व १२ सप्टेंबर रोजी समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर मराठी माध्यमाच्या १६९ आणि उर्दू माध्यमाच्या ५ शिक्षकांना नियुक्ती आदेश देण्यात आले. तसेच १५ प्राथमिक शिक्षकांना पदवीधरची पदोन्नती देण्यात आली. जिल्हा परिषदेत जि.प. उपाध्यक्षा भावनाताई नखाते, सीईओ बी.पी.पृृथ्वीराज, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, माध्यमिक शिक्षणाधिकारी वंदना वाहुळ, उपशिक्षणाधिकारी संजय ससाणे यांच्या उपस्थितीत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यामुळे १८९ रिक्त जागांचा अनुशेष भरला गेला आहे. उर्वरित २२ जागा रिक्त राहिल्या आहेत.दरम्यान, या संदर्भात बोलताना जि.प.शिक्षण सभापती भावनाताई नखाते म्हणाल्या की, जिल्हा परिषदेत ९०० शिक्षक, मुख्याध्यापकांचा रिक्त पदांचा अनुशेष होता. शिक्षणमंत्र्यांकडे या संदर्भात पाठपुरावा केला. त्यानंतर आतापर्यंत ८३९ शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. उर्वरित ४०० शिक्षकांच्या पदांचा अनुशेष भरुन काढण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीTeacherशिक्षक