शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Parabhani:सेलूमध्ये वेठबिगारी उघड, तेलंगणाच्या २८ मजूर, १० मुलांची सुटका; चार जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 16:13 IST

या घटनेमुळे जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रातील मजूर शोषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

परभणी : सेलू तालुक्यात तेलंगणा राज्यातून आणलेल्या २८ मजूर व त्यांच्या कुटुंबीयांना मागील चार महिन्यांपासून कामाला लावण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी चारठाणा पोलिस ठाण्यात आर. बी. कन्ट्रक्शनच्या प्राधिकृत अधिकाऱ्यासह चौघांविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सामाजिक कार्यकर्ता तथा असंघटित कामगारांचे विशेष सेल, जिल्हा विधिसेवा प्राधिकरण बीडचे सदस्य तत्त्वशील बाबूराव कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार तेलंगणा राज्यातील सामाजिक कार्यकर्ता रामलिंग बिक्षम मंडडी यांनी संपर्क साधून तेलंगणातील काही मजुरांना नांदगाव शेत-शिवार (ता. सेलू) येथे वेठबिगार मजूर म्हणून ठेवण्यात आल्याची माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे जिल्हा विधिसेवा प्राधिकरण परभणीच्या सूचनेनुसार चारठाणा, जिंतूर पोलिस, नायब तहसीलदार व महसूल प्रशासनाच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. मजुरांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी केली असता, जास्त मजुरीचे आमिष दाखवून तेलंगणातून महाराष्ट्रात आणल्याचे, तसेच ठरलेल्या कामापेक्षा अधिक काम करून घेतले जात असल्याचे आणि मजुरीचे पैसे कमी दिले जात असल्याचे मजुरांनी सांगितले. या मजुरांना बाबासाहेब काकडे (आर. बी. कन्ट्रक्शनचे प्राधिकृत अधिकारी), भुसाबागा येरेया, मित्तेकृष्णया व एकतापू पैतया या ठेकेदारांनी कामावर लावल्याचे पुढे आले. प्रशासनाने सर्व मजुरांना त्यांच्या कुटुंबीयांसह सुरक्षितरीत्या चारठाणा पोलिस ठाण्यात आणून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

या घटनेमुळे जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रातील मजूर शोषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. प्रशासनाने सर्व मजुरांना शुक्रवारी त्यांच्या कुटुंबीयांसह सुरक्षितरीत्या चारठाणा पोलिस ठाण्यात आणून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रातील मजूर शोषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक मुंजाजी दळवे करीत आहेत.

जिल्हा न्यायाधीशांनी साधला संवाद
सेलू तालुक्यातील नांदगाव शेतशिवारात वेठबिगारीत अडकलेल्या मजुरांच्या सुटकेनंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्वला म. नंदेश्वर यांनी सुटका करण्यात आलेल्या कामगारांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी त्यांनी कामगारांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांना कायदेशीर संरक्षणाबाबत दिलासा दिला. कामगारांनी वेठबिगारी दरम्यान भोगलेल्या हालअपेष्टा व मानसिक त्रास याबाबत आपली आपबीती मांडली. जिल्हा न्यायाधीशांनी कामगारांचे म्हणणे ऐकून घेत कायदा तुमच्या पाठीशी आहे. कोणत्याही दबावाला बळी पडू नका, असा विश्वास दिला. यावेळी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे सचिव भूषण काळे उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani: Forced Labor Exposed; 28 Laborers, 10 Children Rescued in Selu

Web Summary : 28 laborers, including 10 children from Telangana, were rescued from forced labor in Selu, Parbhani. Four individuals face charges. Victims were lured with high wages but exploited. A legal process has begun, and authorities are investigating.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीSocialसामाजिक