शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

Parabhani: सावकारीच्या जाचाने घेतला शेतकऱ्याचा बळी; सेलूत ५५ वर्षीय शेतकऱ्याने संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 18:42 IST

धमक्यांच्या रेकॉर्डिंगने उडाली खळबळ; मोबाईल रेकॉर्डिंगमध्ये दडलंय मृत्यूचं रहस्य?

सेलू (परभणी): शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये, त्यातच आता खासगी सावकारीच्या त्रासाची भर पडली आहे. सेलू तालुक्यातील हादगाव पावडे येथील ५५ वर्षीय शेतकरी प्रभाकर उत्तमराव पावडे यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आपल्याच शेतात झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सावकाराच्या जाचामुळेच हे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

प्रभाकर पावडे यांनी झाडाला गळफास घेतल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. यावेळी त्यांच्या शरीराची थोडी हालचाल दिसत असल्याने ग्रामस्थांनी तातडीने त्यांचा फास सोडून त्यांना सेलू उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला.

मोबाईल रेकॉर्डिंगमध्ये दडलंय मृत्यूचं रहस्य? 
प्रभाकर पावडे यांच्या आत्महत्येमागे एका खासगी सावकाराचा मानसिक छळ असल्याचे समोर येत आहे. "एका सावकाराने व्याजाच्या पैशासाठी सतत तगादा लावला होता. सोमवारी त्याने मोबाईलवर फोन करून धमक्या दिल्या होत्या, त्याचे रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे," असा खळबळजनक आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या दबावामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दीपक बोरसे आणि त्यांच्या पथकाने रुग्णालयात धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मोबाईल रेकॉर्डिंग आणि नातेवाईकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रभाकर पावडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि दोन मुली असा मोठा परिवार असून, कुटुंबाचा आधार गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani Farmer Commits Suicide Due to Loan Shark Harassment

Web Summary : A 55-year-old farmer in Parbhani, burdened by private moneylender harassment, committed suicide. Relatives allege constant threats and pressure from a loan shark drove him to this extreme. Police are investigating the mobile recording of threats and have registered a case of accidental death, initiating further inquiry based on family complaints.
टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याparabhaniपरभणीFarmerशेतकरी